बुलढाणा शहरात चालणाऱ्या अश्लील चाळ्यांना आवरण्यासाठी ‘सकल मराठा समाज’आक्रमक !

1118

कॅफेमध्ये चालतात इलू-इलू..चे प्रकार..!!

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (1 MAR.2023) महाराष्ट्रामध्ये न्याय्य हक्कांसाठी मराठे करोडोच्या संख्येने शिस्तबध्द पध्दतीने रोडवर उतरुन ‘मूक मोर्चा’ काढले मार्चामध्ये लाखो-करोडोंच्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. मराठा समाज हा शांत समाज आहे, अन्यायाविरुध्द तो पोलिस प्रशासनाकडे निवेदन, आंदोलन व मोर्चाद्वारे पाठपुरावा करतो, द ग्रेट मराठा समाजाचा इतिहास आहे. बुलढाणा शहरातील काही नेटकॅफेमध्ये कॅफेच्या नावाखाली मुला-मुलींचे गैरप्रकार वाढले असून मुलींना मोहपाशात अडकविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, याबाबत मराठा समाज बांधव तसेच पत्रकार बांधव जिल्हा पोलिस अधिक्षकांना निेवेदन देण्यास गेले असता त्यांच्याशी जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप मराठा समाज बांधवांकडून एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे.

सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने आज बुधवार 1 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा शहर तसेच शहरालगत ग्रामीण भागामध्ये बरेचसे कॅफे असून कॅफेमध्ये स्पेशल कॅबिन व कॅबीन आतमधून लॉक करण्याची सुविधा असल्याने ते आक्षेपार्ह आहे. अल्पवयीन मुलींना मोहपाशात अडकवून कॅबिनमध्ये घेवून दार आतमधून करणे, बरेच जोडपे वेटींगवर असतात, कॅफे मालक त्यांना ही सुविधा पुरवितात व त्यासाठी तासभरासाठी वेगळे चार्जेस लावतात. हा प्रकार गंभीर असल्याचे नमूद करीत अल्पवयीन याची पाहणी केल्यास वेगवेगळे धर्मीय अल्पवयीन जोडपे निदर्शनास येतील, असे निवेदनात म्हणत धर्मा-धर्मात वाद व तेढ होण्याची शक्यता नाकारली जावू शकत नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी करीत सकल मराठा समाज बांधवांनी कॅफे मालकांना इशारा देत कॅफे कॅबिन मुक्त करावे तसेच कॅफेत सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरवून योग्य त्या मार्गाने कॅफे बंद पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात असून निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा पोलिस अधिक्षक, आमदार संजय गायकवाड यांना देण्यात आल्या आहेत.

मराठा समाज व पत्रकारांना अपमानास्पद वागणूकीचा आरोप..
पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी सकल मराठा समाजबांधव व पत्रकार गेले असता शिपाई निरोप घेऊन जातो, मात्र आज शिष्टमंडळ गेले असता एस पी स्वतःच केबिन बाहेर आले व काय लावले ?ठाणेदाराला भेटले का? डीवायएसपीला भेटले का? असा प्रश्नांचा भाडीमार केल्याने या लोकशाही व कायद्याच्या राज्यात गुन्हा ठरतो काय? अश्या संतप्त प्रतिक्रीया समाजाकडून व्यक्त केल्या जात आहे.

जिल्ह्यातील दुसरी घटना..
सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव साजरा होतो. येथे पोलिसांना दंगल घडवायची होती. यासाठी जिजाऊ भक्तांना डिवचण्यात आले, असा गंभीर आरोप शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी यापूर्वीच केला आहे. तर आज सकल मराठा समाजाला उद्धट वागणूक देण्यात आली. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर लाठिचार्ज ची घटना राज्यभर गाजत आहे, हे विशेष!