Monday, April 20, 2026
Home Buldana मोताळ्याचा गुरुवारचा आठवडी बाजार रद्द पोळा सणामुळे बुधवारी भरणार बाजार !

मोताळ्याचा गुरुवारचा आठवडी बाजार रद्द पोळा सणामुळे बुधवारी भरणार बाजार !

172

मोताळा- मोताळा येथील आठवडी बाजार गुरुवार 14 सप्टेंबर रोजी आहे. परंतु त्या दिवशी पोळा हा सण असल्यामुळे आठवडी बाजार बुधवार 13 सप्टेंबर रोजी भरणार आहे, याची नागरिक व व्यावसायीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मोताळा नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोताळा येथे दर गुरुवारी मोठा आठवडी बाजार भरतो. बाजारामध्ये 50 ते 60 गावातील लोक येतात. तसेच नांदुरा, मलकापूर, बुलढाणा यासह आदी शहरातील व्यावसायीक आपले दुकाने थाटतात. गुरुवारी 14 सप्टेंबर रोजी आठवडी बाजार आला असून त्याच दिवशी पोळा आला आहे. मोताळ्यात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने गुरुवारचा आठवडी बाजार बुधवार 13 सप्टेंबर रोजी भरणार आहे, याची नागरिक, व्यावसायीक, आठवडी बाजारामध्ये दुकाने व भाजीपाला विक्री करणाऱ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन मोताळा नगर पंचायतच्यावतीने करण्यात आले आहे.

Don`t copy text!