जिल्हाधिकारीपदी डॉ. किरण पाटील रूजू

51

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (13 Sep.2023)जिल्हाधिकारीपदी डॉ. किरण पाटील 12 सप्टेंबर रोजी रूजू झाले आहेत. त्यांनी डॉ. ह.पी. तुम्मोड यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. जिल्ह्याची बलस्थाने ओळखून विकासात्मक कामे करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. पाटील यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर विविध विभागाप्रमुखांशी संवाद साधला. समस्या जाणून प्राथम्याने कामकाजाच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती, त्यावरील उपाययोजना, आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना करावयाची मदत याबाबत आढावा घेतला. विभागप्रमुखांनी सक्रीय कामकाज करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून त्यानुसार येत्या दहा-वीस वर्षाचा कालावधीसाठी नियोजन करण्यात येणार आहे. हा आराखडा अंतिम स्वरूपात आला आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्याला नवीन दिशा देण्याचे काम करण्यात येणार आहे. प्रशासकीय कामकाजासोबतच येत्या काळात कृषी, महसूल, पुरवठा, निवडणूक, नियोजन, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण या विभागाच्या विकासात्मक योजनांतून मागास राहिलेल्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. तसेच मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या सूचनाही डॉ. पाटील यांनी दिल्या.