मोताळा: ‘कानून के हात बहोत लंबे होते है’ याचा प्रत्येय बोराखेडी पोलिसांनी चोरीच्या दोन घटनेत दिला आहे. एका गतिमंद महिलेचे सोन्याचे दागिणे लंपास करणाऱ्या महिलेला 12 तासात तर 20 मार्च रोजी बुलढाणा-चिंचपूर रोडवर दुचाकीवरुन जाणाऱ्या एकाजणाचे संगनमताने 7 हजार लुटणाऱ्या दोघांना 2 तासात पकडून चोरट्यापेक्षा पोलिसांचे नेटवर्क पावरफुल्ल असल्याचा प्रत्येय पोलिसांनी दिला आहे.
झाले असे की, नांदुरा तालुक्यातील खडदगाव येथील मंगेश सुनील घोगले (वय 28) हा 20 मार्च रोजी आरोपी यांचे मोटार सायकल क्रं. MH-19-ER-2292 यावर बसून जात होता. दरम्यान सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बुलढाणा-मलकापूर रोडवरील बाबा पेट्रोल पंपासमोर शंकर श्रीराम चव्हाण (वय 18) रा. मोताळा व अमजद शाह कदर शाह रा.बिस्मिल्ला नगर जामनेर ता.जामनेर जि.जळगाव या दोघा चोरट्यांनी संगणमत करुन मंगेश घोगले याच्या खिश्यातील 7 हजार रुपये चिचपुर शिवारात लंपास केले, अशा मंगेश घोगले याच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर एक आव्हान होते. बोराखेडी पोलिस निरिक्षक सिताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कपले, पोहेका नंदकिशोर धांडे, हेकाँ. कपिश काशपाग, पोकॉ.ज्ञानेश्वर धामोडे यांनी सीसिटीव्ही फुटेज व तांत्रीक बाबीचा तपास करीत 2 तासात शंकर श्रीराम चव्हाण (वय 18) रा. मोताळा व अमजद शाह कदर शाह रा.बिस्मिल्ला नगर जामनेर ता.जामनेर जि जळगाव ह.मु.मोताळा या दोघा चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 7 हजार रुपये जप्त करुन चोरट्यांपेक्षा पोलिसांचे नेटवर्क पावरफुल्ल असल्याचे दाखवून दिले.


























