मोताळ्यात शेखर संचेती यांचे घर फोडले; 4 लाखाचे दागीणे लंपास !

404

Buldana News Update
मोताळा(10 Dec.2022) मोताळ्यात चोरट्यांनी आपले नेटवर्क ‘ब्रेक के बाद’ पुन्हा सक्रीय केले असून प्रभाग क्र.16 मधील शेखर संचेती यांचे घर टारगेट करीत आज 10 डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या संचेती यांच्या घरामधील कपाट फोडून 1 लाख रुपये नगद तर 3 लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मोताळा शहरातील जुना मलकापूर रोड प्रभाग क्र.16 मध्ये शेखर संचेती यांचे घर असून घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी 4 लाखाची चोरी केली. चोरट्याने घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत 6 तोळे सोने अंदाजे किंमत 3 लक्ष तर 1 लाख रुपयांच्या रोख रकमेवर डल्ला मारला. सदर संशयीत चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून त्या चोरट्यांना लवकरच पकडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेखर संचेती हे स्व.बी.डी.विद्यालयात नोकरीला असल्याने ते आपल्या ड्युटीवर तर त्यांच्या पत्नी दुकानावर गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी आपले काम फत्ते केले. घटनास्थळाला डीवायएसपी सचिन कदम यांनी भेट देवून घटनस्थळाची पाहणी केली. शहरात दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडणे हे बोराखेडी पोलिस प्रशासनासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. याबाबत बोराखेडी पोस्टे.ला अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.