सोयाबीन पेटविल्याचा राग विकोपाला गेला..! मोठ्या मुलाने वडीलांचा मुर्दाचा पाडला; पत्नी व छोट्या मुलाने त्यावर पडदा टाकला!

705

तिन्ही आरोपींना एका दिवसाची पोलिस कोठडी!

बुलढाणा(BNUन्यूज) वडिलाने सोयाबीन पेटविल्याचा राग अनावर झाल्याने स्वत:चा मुलाने जन्मदात्या वडीलांना बेदम मारहाण केल्याने त्यामध्ये एकनाथ फोलाने यांचा मृत्यू झाल्याची कबुली तसेच मुलाच्या कृत्यावर पडदा टाकत मृतकाची पत्नीने खोटा बनाव करीत, पतीने सोयाबीन पेटविल्याची माहिती दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद दिल्याने रायपूर पोस्टे.ला 30 ऑक्टोबरला मर्ग दाखल करण्यात आला होता. परंतु 4 नोव्हेंबर रोजी मृतक एकनाथ फोलाने यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टची पडताळणी करुन तपासणी केली असता, मृतकाचा मोठा मुलगा राजु उर्फ शांतीराम फोलाने याने वडीलांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची कबुली दिल्याने 5 नोव्हेंबरच्या रात्री 12.43 वाजता गुन्हा दाखल करुन आरोपीवर खुन्याच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन दोन आरोपींना अटक केली होती. तर तिसऱ्या आरोपीला आज 5 नोव्हेंबर रोजी अटक करुन चिखली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनाविली आहे.

बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील एकनाथ फोलाने मृत्यू प्रकरणाला 4 नोव्हेंबर रोजी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर वेगळेच वळण मिळाले असून मृतक एकनाथ फोलाने यांनी त्यांचे शेतातील सोयाबीनच्या सुडीला पेटवून दिल्याने मृतकाचा मोठा मुलगा राजु उर्फ शांतीराम एकनाथ फोलाने याने वडीलाला पाठीवर काठीने व छातीवर लाथा बुक्क्यांनी मारहाण जबर मारहाण केल्याने त्यामध्ये एकनाथ फोलानेंचा मृत्यू झाल्याची कबुली दिली तर सुभद्रा एकनाथ फोलाने व त्यांचा मुलगा गणेश उर्फ विजय फोलाने यांना माहिती असून त्यांनी खरी माहिती लपवून खोटी माहिती देवून पोलिस प्रशासनाची दिशाभूल करुन आरोपीला खुनात सहकार्य केल्याचे निष्पन्न झाल्याने रायपूर पोस्टे.चे पोलिस उपनिरीक्षक गजाजन दत्ता बास्टेवाड यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सुभद्रा फोलाने, राजु उर्फ शांतीराम एकनाथ फोलाने, गणेश उर्फ विजय फोलाने यांच्यावर भादंवीचे कलम 302, 201, 202, 203 अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक्‍ करण्यात आली होती. त्या आरोपींना आज चिखली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनाविली आहे.

मृतकाच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन झाला होता मर्ग दाखल..

रायपूर पोस्टे.अंतर्गत असलेल्या रायपूर येथील ५० वर्षीय एकनाथ फोलाने यांनी दारूचे नशेमध्ये स्वतःच्या शेतातील पाच एकरामधील सोयाबीन सुडी पेटवून दिली. सदर घटनेची माहिती त्यांनी पत्नी, मुले यांना दिली. ३० ऑक्टोबरच्या रात्री फोलाने यांचा मृत्यू झाल्याची माहिती रायपूर पोलीस स्टेशन ठाणेदार राजवंत आठवले यांना मिळताच त्यांना संशय आल्याने त्यांनी मृतक एकनाथ फोलाने यांच्या प्रेताचा पंचनामा करून प्रेत जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे शवविच्छेदनासाठी पाठविले होते. रायपूर पोलीस स्टेशनला या प्रकरणी मृतकाची पत्नी सुभद्रा फोलाने हिचे फिर्यादीवरुन मर्ग देखील दाखल करण्यात आला होता.