कॉग्रेस नेते गणेशसिंग राजपूत यांची सामाजिक बांधिलकी.. मलकापूर आगाराने वेळेवर बसेस बंद केल्याने विद्यार्थ्यांना स्वखर्चाने ऑटो करुन सोडविले घरी!

1583

विष्णु शिराळ

मोताळा (BNU न्यूज) मलकापूर आगाराच्या बस चालकाने 16 सप्टेंबर रोजी मलकापूर पिं.देवी रोडवर सकाळी 6 वाजेच्या सुमारास निष्काळजीपणे बस चालवून रस्त्याने चालणाऱ्या दोघांना उडवून दिले यामध्ये त्या दोघांनाही आपले हात गमवावे लागले. संतप्त ग्रामस्थांनी मलकापूर आगारामध्ये राडा केल्याने मलकापूर धा.बढे, पिं.देवी रोडवरील सर्व बसेस ऐन वेळेवर बंद असल्याने विद्यार्थ्यांची मोठी फजिती झाली होती. विद्यार्थ्यांकडे घरी जाण्यासाठी पैसे सुध्दा नव्हते, सदर घटनेची माहिती काँग्रेस नेते Adv.गणेशसिंग राजपूत यांना मिळताच त्यांनी 400 ते 500 विद्यार्थ्यांना गावानुसार स्व:त ऑटोचे भाडे देवून विद्यार्थ्यांना सुरक्षीत घरी सोडवून सामाजिक बांधिलकी जोपासली.

मलकापूर आगाराची मलकापूर ते पिं.देवी बस 16 सप्टेंबरच्या सकाळी 5.30 वाजता चालक निघाली होती. या बसच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे पिपळगांव देवीला निघालेल्या बसचा पत्रा हा कर्दनकाळ ठरला. बाहेर निघालेल्या पत्र्याने आव्हा येथील परमेश्वर सुरडकर वय 55 वर्ष व उऱ्हा येथील विकास गजानन पांडे वय 22 वर्ष या अग्नीवीरची तयारी करणाऱ्या युवकांला धडक दिली. दोघांचे हात धडापासून वेगेळे केले. संतप्त नागरिकांनी मलकापूर आगारामध्ये जावून आगार व्यवस्थापकाला जाब विचारला. तणावजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिपळगांव देवी व पिप्रिंगवळी मार्गाच्या सर्व बसेस ऐनवेळेवर बंद करण्यात आल्याने पिप्रिंगवळी परिसरातील दाभाडी , टेंभी , माकोडी , चार्वदा, धोंनखेड , पोफळी, तपोवन येथील मोठ्या प्रमाणातील विद्यार्थी शिक्षणासाठी दाताळा व मलकापूर येथे शिक्षणासाठी जात असतात.

विद्यार्थ्यांकडे पास असल्याने त्यांच्याकडे पैसे नव्हते व ऐनवेळेवर बस बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थी-विद्यार्थीनींना घरी कसे जावे अशी चिंता निर्माण झाली होती. सदर घटनेची माहिती पोफळी येथील सामाजिक कार्यकर्ते छोटू पाटील यांना माहिती होताच त्यांनी मलकापूर येथे अपघात ग्रस्ताच्या भेटीसाठी गेलेले काँग्रेस नेते Adv.. गणेशभाऊ राजपूत यांना फोनवरुन दिली. गणेश राजपूत यांनी हॉस्पीटलमधील अपघात ग्रस्तांची विचारपूस करून लगेच दाताळा गाठले. विद्यार्थीची भेट घेऊन विचारपूस करीत विद्यार्थ्यांच्या गावानुसार संख्या लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वत:च्या पैश्याने ऑटोची व्यवस्था विद्यार्थ्यांना सुरक्षीत त्यांच्या घरी पोहचवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांचे विद्यार्थ्यांच्या पालकांनी आभार व्यक्त केले.