ठाकरे व शिंदे यांचा दसरा मेळावा, अस्तित्वाची लढाई की आत्मपरिक्षण ?

274

बुलढाणा(BNU न्यूज) शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटले की, शिवभक्त शिवसैनिकांना पंढरीच वाटायची, शिवसैनिकांना मुंबई येथील शिवाजी पार्कवरुन बाळासाहेबांच्या विचारांचे उर्जास्त्रोत मिळायचे ती शिदोरी घेवून हजारो लाखो शिवसैनिक पक्षासाठी एकनिष्ठेने काम करायचे. परंतु शिवसेनेत उध्दव ठाकरे व शिंदे असे दोन गट निर्माण झाले. शिंदे गटाने बाळासाहेबांच्या विचारांना उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी युती करुन तिलांजली दिल्याचा कांगवा करुन शिवसेनेशी बंडखोरी करीत 40 आमदारांसह भाजपाशी हात मिळवणी करुन राज्यामध्ये सरकार स्थापन केले. भाजपा व शिवसेना दोन पक्ष हिंदुत्वादी पक्ष असल्याने संपूर्ण हिंदुत्वादी संघटना व लोक त्यांना पसंदी देतात, परंतु भाजपा व सेना हे हिंदुत्वावादी पक्षच एकमेंकापासून दुरावल्या गेल्याने हिेदुत्वाचे खरे वारसदार कोण? शिंदे व ठाकरे यांचा दसरा मेळावा अस्तित्वाची लढाई की आत्मपरिक्षण, असा प्रश्न हिंदु धर्मीयांना स्वत:ला विचारण्याची पाळी आली आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला संबोधीत करतांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आलेले शिवसैनिक भाड्याने आणलेले कार्यकर्ते नसून ते स्वयंस्फूर्तीने आलेले सच्चे शिवसैनिक आहे. एवढी अफाट गर्दी पाहून नतमस्तक झालो, या शब्दांनी उध्दव ठाकरे यांनी कार्यक्रमास सुरुवात करीत मेळाव्यानंतर रावणाचे दहन होणार असल्याचे सांगायला ते विसरले नाही. काळ बदलत चाललाय, धोकासूर रावणांनी 50 खोके घेतले आहे. माझे बोट हलत नव्हते त्यावेळी ‘कटप्पा’ ने कट करुन उध्दवला संपविण्याचा प्रयत्नात होते, परंतु मी फक्त उध्दव नसून उध्दव बाळासाहेब ठाकरे आहे, असा टोला लगावत देव तुमचे भले करो.. ! शिवसेना ही एकाची नसून मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. हिंदुत्वाला तिलांजली दिली असे म्हणाऱ्यांनी एक मंचावर येवून हिदुत्वावादावर बोलण्याचे विरोधकांना चॅलेंज करीत ठाकरे कुटुंबीयांचा इतिहास पाहण्याचा सल्ला दिला.

अथांग जनसागर साक्ष शिवसेना कुणाची-एकनाथराव शिंदे
मुंबई येथील बीकेसी मैदावरील दसरा मेळाव्याला संबोधीत करतांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेत खरी शिवसेना कुठे आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कुठे आहेत, असा प्रश्न पुढे कोणालाही पडणार नाही, हा अथांग जनसागर त्याची साक्ष आहे, या गर्दीने सिध्द केल्याचे सांगितले. आम्हाला सत्तेपक्षा सत्य अपेक्षीत आहे. बाळासाहेबांचे धगधगते विचार तुमच्या आमच्या धमण्यामध्ये भिनले आहे. आम्ही बाळासाहेबांचा वारसा जिवापाड जपला आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला समजला आहे. आम्हाला 2 महिन्यात फक्त गद्दार आणि 50 खोके या पलिकडे तुम्ही काही बोलत नाही, असा टोला उध्दव ठाकरे यांना लगावला. महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकीत एकीकडे बाळासाहेब व दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मते मागीतले. त्याच आधारावर जनतेने तुम्हाला मतदान केले, पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी युती करुन सरकार स्थापन करुन गद्दारी केली. तुम्ही बापाचे विचार विकले, गद्दार आम्ही नाही गद्दार तुम्हीच असे म्हणत आम्ही गदर म्हणजे क्रांती केल्याचा टोला ठाकरेंना लगावला. सत्येसाठी तुम्ही लाचार झाला तुम्ही महाराष्ट्राशी गद्दारी केली, म्हणून अथांग जनसागर आमच्यासोबत असल्याचे सांगत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ आहोत, तुम्ही मात्र भरकटले आहात, असे सांगत आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वावादी विचारांना पुढे नेण्याचे काम करीत असल्याने जनता आमच्यासोबत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले.

आई-वडिलांची शपथ, भाजपाने गद्दारी केली..
शिवसेनेशी बंडखोरी केल्याने शिंदे गटातील आमदारांना गद्दार, 50 खोके एकदम ओके म्हणून शिवसेनेकडून डिवचले जाते, तर शिंदे गटाचे आमदार बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याचा उध्दव ठाकरेंवर ठपका ठेवीत तुम्हीच गद्दारी केली, आम्ही गदर केल्याचे सांगतात. शिवाजी पार्कवरील 5 ऑक्टोबरच्या भाषणात उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्व आम्ही सोडलेले नसून आई-वडिलांची शपथ घेत भाजपाने पाठीत खंजीर खुपसल्याने भाजपाला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी युती केल्याचे सांगत आम्ही हिंदुत्वाच्या विचारांशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले.

हिंदुत्वाचे खरे वारसदार कोण? प्रश्न मात्र अनुत्तरीतच!
दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे व एकनाथराव शिंदे यांनी हिेदुत्वाचा विचार यावर मंथन झाले की, सत्तेसाठी सर्वकाही क्षम्य, भाजपाचा हिदुत्वाचा अजेंडा व शिवसेना मराठी माणूस व हिंदुचा पक्ष मात्र दोघेही आजरोजी सत्तेसाठी एकमेकांपासून दुरावल्या गेले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी एकनाथराव शिंदे यांनी गदर केल्याचे सांगितले. तर उध्दव ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबीयांचा इतिहास पाहण्याचा सल्ला देत खरा हिंदुत्ववादी कोण? हे पाहण्यासाठी एका मंचावर येण्याचे चॅलेंज केले. एकंदरीत हा दसरा मेळावा म्हणजे ठाकरे व शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई की आत्मपरीक्षण होते? की गर्दी जमविण्याच्या माध्यमातून मुंबई महानगर पालिकेवर डोळा ?? परंतु हिेदुत्वाचे खरे वारसदार कोण? हा प्रश्न मात्रा अनुत्तरीतच राहिला, एव्हढे मात्र निश्चीत !