घाटावरील मुलाने घाटाखालील अल्पवयीन मुलीला पळविले !

553

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (12 Mar.2023)खरंच कोण काय करेल, अन् काय करणार नाही..याचा भरवसाच राहिला नाही. मोताळा तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला चिखली तालुक्यातील युवकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना 8 मार्च रोजी घडली होती. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या अल्पवयीन मुलीला चिखली तालुक्यातील योगेश सुभाष सिनगारे रा.मिसाळवाडी याने 8 मार्चच्या सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान फुस लावून पळवून नेले, अशी फिर्याद आज 12 मार्च रोजी दिली. यावरुन बोराखेडी पोलिसांनी आरोपी योगेश सिनगारे याच्याविरुध्द भादंवीचे कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.