पिं.देवी जगदंबामाता यात्रा महोत्सवाला 6 जानेवारीपासून सुरुवात

221

अ‍ॅड.गणेशसिंग राजपूत व सौ.उज्वलाताई राजपूत यांच्या हस्ते होणार पूजन

बुलढाणा(5 JANU.2022)मोताळा तालुक्यातील विदर्भ व जळगाव खांन्देश सीमेवर असलेल्या पिंपळगाव देवी येथील जगदंबा देवीच्या यात्रेस शुक्रवार 6 जानेवारीपासून सुरुवात होणार असून ही यात्रा 21 जानेवारीपर्यंत चालणार आहे. अ‍ॅड.गणेशसिंग राजपूत व त्यांच्या पत्नी माजी जि.प.सदस्या सौ.उज्वलाताई गणेशसिंह राजपूत यांच्या हस्ते जगदंबा मातेची पुजा करुन यात्रेस सुरुवात होणार आहे.

पिंपळगाव देवी येथील जगदंबा मातेची यात्रा गेल्या 200 वर्षापासून सुरु आहे. या यात्रेत विदर्भ व खांदेश मराठवाड्यातील भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. श्री जगदंबा देवी संस्थान विश्वस्थ चिंधुजी धनगर, शालिकराम धनगर, शांताराम उदेमान धनगर, अशोक नत्थू धनगर यांच्यावतीने शुक्रवार ६ जानेवारी रोजी होणाऱ्या पूजेला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या यात्रेतील सर्वात आकर्षणाचे केंद्र म्हणजे आकाशी पाळणे, छोटे पाळणे, लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने, दाया लेवड्यांची, स्टेशनरी व कटलरी, कपड्यांची दुकाने आकर्षणाची केंद्र राहतील. या यात्रेचा लहानापासून ते मोठ्यापर्यंत मनसोक्त आनंद घेतल्या जातो. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मगील 2 ते 3 वर्षापासून यात्रा मोठ्या प्रमाणात भरली नसल्याने यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. पिं.देवी ग्रामपंचायतच्यावतीने येणाऱ्या भाविकभक्तांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

यात्रेत पोलिसांचा चोख बंदोबस्त..
यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी धा.बढे पोलिस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून बंदोबस्तासाठी बुलढाणा पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.