बोराखेडी पोलिसांची धडक कारवाई! विद्युत मोटारपंप चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!!

1347

6 आरोपींकडून 20 हजाराचे साहित्य केले जप्त

मोताळा(BNUन्यूज) बोराखेडी पोलिस स्टेशन अंतर्गत अनेक चोरींच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी काही चोरट्यांचा पोलिसांनी शोध लावला तर अनेक चोरटे अजुनही मोकाटाच आहे. बोराखेडी पोस्टे.ला अंतर्गत असलेल्या टाकरखेड येथे तीन शेतकऱ्यांच्या विहिरीतील विद्युत पंप चोरीच्या घटना घडल्या होत्या, याबाबत बोराखेडी पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द 7 ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या 6 चोरट्यांच्या आज बुधवार 19 ऑक्टोबर रोजी बोराखेडी पोलिसांनी मुसक्या आवळीत त्यांच्याकडून 20 हजाराचे साहित्य जप्त केले आहे.

नांदुरा तालुक्यातील टाकरखेड शिवारात अशोक मधुकर डहाके शेत गट नं. 146 मध्ये विहिरीत असलेली सीआरआय कंपनीची 5 एसपीचा मोटारपंप तसेच त्यांच्या शेताशेजारी ज्ञानदेव भानुदास वराडे, सुभाष श्रीराम शेळके यांच्या विहिरीतील दोन मोटारपंप असे एकूण तीन मोटारपंप चोरीला गेले होते. अशोक डहाके यांच्या फिर्यादीवरुन 7 ऑक्टोबर रोजी बोराखेडी पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवीचे कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जगाचा पोशिंदा नैसर्गीक आपत्तीमुळे मोठ्या आार्थिक अडचणीत सापडला आहे, असे असतांना त्यांच्या शेतातील विद्युत मोटारपंप चोरीला जाण्याच्या घटना त्यांना आणखी आर्थिक अडचणीत टाकणाऱ्या होत्या. त्या अज्ञात चोरट्यांना पकडणे बोराखेडी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान ठरले होते. जिल्हा पोलिस अधिक्षक, बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच बोराखेडी ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ. नंदकीशोर धांडे, पोना.दिपक पवार, पोकाँ.गणेश बरडे यांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास यंत्रणा सज्ज करीत आरोपी विकी उर्फ सोन्या रमेश कोकाटे, पवन प्रल्हादसिंग जाधव, लखन नरेंद्रसिंग जाधव, चरणसिंग रंजनसिंग जाधव, शेखर योगेंद्रसिंग जाधव, अभय रविंद्र नारखेडे सर्व रा.टाकरखेड ता.नांदूरा यांना ताब्यात घेवून त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी सदर विद्युत मोटारपंप चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. उपरोक्त आरोपींकडून चोरीस गेलेल्या तीन मोटारपंप किंमत 20 हजार रु.चे साहित्य जप्त करण्यात आले. सध्या आरोपी पीसीआर मध्ये असून बोराखेडी पुढील तपास करीत आहे.

दिवाळीच्या बाजाराचे शिस्तबध्द नियोजन करणे गरजेचे..

मोताळा शहरातील आठवडी बाजारात मोटार सायकल चोरी तसेच चोरींच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गुरुवार 20 आक्टोबर रोजी मोताळा शहरात दिवाळीचा मोठा आठवडी बाजार भरणार आहे. या बाजारात मोठी गर्दी राहणार असल्याने चोरट्यांची नजर नागरिकांच्या मोटार सायकल व पैश्यांवर राहणार असल्याने बोराखेडी पोलिस प्रशासन व मोताळा नगर पंचायत प्रशासनाने आठवडी बाजाराचे शिस्तबध्द नियोजन करणे गरजेचे आहे.