बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षकांची आझाद मैदान मुंबई येथे ‘ठेचा भाकर’ खावून साजरी केली दिवाळी!

157

बुलढाणा (BNUन्यूज) राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांना १०० टक्के पगार सुरू करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मागील 10 ऑक्टोबरपासून शिक्षक धरणे आंदोलन करीत आहे. या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभाग घेतला असून ऐन दिवाळीच्या दिवशी चटणी भाकरी खाऊन त्यांनी शासन व प्रशासनाचा धिक्कार करीत काळी दिवाळी साजरी केली.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा शाळांमध्ये विनावेतन काम करणारा शिक्षकांची संख्या ४३ हजाराच्यावर असून १५ नोव्हेंबर २०११ व ४ जून २०१४ शासन निर्णय अनुदान वितरणाचे सूत्र लागू करून शिक्षकांना न्याय द्यावा, यासह आदी विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन सुरू केले असून विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातून शिक्षक समन्वयक संघाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम किलबिले, सुनील बिलारी ,गजानन मिसाळ, गौतम वाकोडे, थोटे मॅडम, वाघ मॅडम,गजानन मुळे, शशिकांत काळवाघे,अरुण खरात, सावळे सर,संदीप मिसाळ, थुट्टे सर, कैलास गिराम, गिरीष मखमले यांच्यासह शेकडो शिक्षक बांधव उपस्थित होते.