वाघजाळ येथे दरोडा; लाखोचा मुद्देमाल लंपास !

70

मारहाणीत सागर शिंबरेचा पाय तर सोनलचा हात फॅक्चर !!

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा- तालुक्यातील वाघजाळ(टाकळी) येथे 16 डिसेंबरच्या सकाळी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास 4 दरोडेखोरोंना दरोडा टाकून वाघजाळ येथील शिंबरे पती-पत्नी व मुलाला स्पींकलरच्या रॉडने बेदम मारहाण करीत कपाटातील व महिलेच्या अंगावरील सोने व नगदी 17 ते 18 हजार रुपये, असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे वाघजाळसह परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली असून दहशत पसरली आहे. दरोडेखोरांना पकडणे पोलिसासमोर एक मोठे आव्हान आहे.

मलकापूर-बुलढाणा रोडवरील वाघजाळ फाट्यापासून अर्धा कि.मी.अंतरावर असलेल्या वाघजाळ येथे चार दरोडेखोरांनी आजुबाजुच्या परिसरातील दरवाजाच्या कडी-कोंडा लावून सागर शिंबरे यांच्या घराचे समोरील दरवाजाची कडी लावून घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून घरामध्ये प्रवेश केला. दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करीत सागर किसना शिंबरे (वय 35), सौ.सोनल सागर शिंबरे (वय 30), सार्थक सागर शिंबरे (वय 12) यांना स्पींकलरच्या नळ्यांनी बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये सोनल शिंबरे यांचा हात फॅक्चर झाला तर सागर शिंबरे यांचा पाय फॅक्चर झाला.

दरोडेखोरांनी सोनल शिंबरे यांच्या अंगावरील व कपाटातील सोन्याचे दागीणे व नगदी 18 हजार रुपये असा लाखोचा मुद्देमाल लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून फिर्याद दिल्यानंतर अचूक आकडा समोर येईल. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेवून दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सागर शिंबरे व सोनल शिंबरे यांना बुलढाणा येथील डॉ.भवटे यांच्या हॉस्पीटलमध्ये सोनल यांच्या हातावर तर सागर यांच्या पाय फॅक्चर झाल्याने प्लॅस्टर करुन घरी आणण्यात आले.

खामगाव अप्पर पोलिस अधिक्षकांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच खामगाव अप्पर पोलिस अधिक्षक अशोक थोरात, बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी गुलाबराव वाघ, बोराखेडी पोलिस निरीक्षक बळीराम गिते, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी आज 16 डिसेबरच्या सकाळी 7 वाजता घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

डॉग स्कॉट राणीला पाचारण

घटनेची गंभीरता पाहता पोलिस प्रशासनाने डॉग स्कॉट राणीला पाचारण करण्यात आले होते. राणीला घेवून पोहेकाँ.बबन जाधव, हवालदार विलास पवार घेवून आले होते. परंतु चोरट्यांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे सोडले नसल्याने राणीला चोरट्याचा माग घेता आला नाही. यामुळे पोलिसांपेक्षा चोरट्यांचे नेटवर्क नेहमीप्रमाणे पावर फुल्ल निघाल्याची चर्चा आहे.

112 वर कॉल अन् 10 मिनीटात पोलिस हजर

गावातील दरोड्याची माहिती मिळताच माजी सभापती तेजराव पाटील यांनी 112 नंबरवर कॉल करुन पोलिसांना दरोड्याची हकीकत सांगितले असता पोलिस निरीक्षक बळीराम गिते, अपीआय राजवंत आठवले, पोकॉ.प्रविण पडोळ, बिट जमादार कपील कशपाक, इर फान शेख 10 मिनीटात घटनास्थळी हजर होवून शिंबरे दाम्पत्याला बुलढाणा येथे उपचारार्थ दाखल केले. पोलिसांनी वाघजाळ फाटा तसेच रोहिणखेड व मोताळ्याकडील सीसीटीव्ही तपासले असून त्या दिशेने तपास करीत आहे.