त्रिमुर्ती पेट्रोल पंपाजवळ भिषण अपघात; चारचाकीने युवकाचा पायाचा चुराडा केला !

1757

चालकावर बोराखेडी पोस्टे.ला गुन्हा दाखल

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (16.JUNE.2023) बुलढाणा-मलकापूर रोडवरील परडा शिवारात असलेल्या त्रिमुर्ती पेट्रोल पंपाजवळ या चारचाकी वाहनाने टाकळी(वा) येथील शुभम डहाके या दुचाकीस्वाराला उडविले. यामध्ये शुभम डहाके हा गंभीर जखमी होवून त्याच्या डाव्या पायाचा चुराडा झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याच्यावर बुलढाणा व छत्रपती संभाजी नगर येथे उपचार करुन पुढील उपचारार्थ पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. सदर घटना रविवार 11 जून रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली होती. 15 जून रोजी आरोपी चालकावर बोराखेडी पोस्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा मलकापूर रोडवर परडा शिवारात असलेल्या त्रिमुर्ती पेट्रोल पंपावर टाकळी (वा) येथील शुभम रामदास डहाके हा 24 वर्षीय युवक 11 जून रोजी मोटार सायकल क्र.MH 28 -AV 7353 ने वाघजाळ फाट्याकडून सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मोताळाकडे जात होता. यावेळी त्याला मोताळाकडून बुलढाणा जाणाऱ्या महिंद्रा गाडी क्र.MH 28 AZ 5873 च्या चालकाने जबर धडक दिली. धडक एवढी भिषण होती की, यामध्ये दुचाकीस्वार शुभम डहाके याच्या डाव्या पायाचा अक्षरश: चुराडा होवून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याला महींद्रा गाडी क्र. 28 AZ 5873 चालकाने त्याची गाडी थांबवून गाडीमध्ये फिर्यादी तुळशीराम सपकाळ, रमेश समाधान झामरे, मोहन श्रीधर राजनकर यांनी गाडीत टाकून त्याला प्रथम डॉ.भवटे हास्पीटल बुलढाणा येथे त्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथे सिग्मा हॉस्पीटल आणि तेथून पुढे ससून हास्पीटल पुणे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे शुभम डहाके यांच्या पायाला गंभीर मार लागून त्याच्या पायाचा चुराडा झाला, अशा तुळशीराम सपकाळ रा.टाकळी (वा) यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला आरोपी चालकाविरुध्द भादंवीचे कलम 279, 337 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.