धाड येथील २५ वर्षीय युवक बेपत्ता

115

धाड (BNU न्यूज)-बुलडाणा तालुक्यातील धाड येथील २५ वर्षीय युवक शेख फिरोज शेख अकबर तवक्कल नगर धाड येथून ८ सप्टेंबर बेपत्ता झाला आहे. धाड पोस्टे.ला शेख रफीक शेख अकबर यांच्या फिर्यादीवरुन मिसींग दाखल करण्यात करण्यात आली आहे.
बेपत्ता झालेल्या शेख फिरोज शेख अकबर याचा रंग काळा सावळा, उंची अंदाजे १६५ सेमी. चेहरा लांबट, बांधा सतपातळ, केस काळे, मिशी बारीक काळी दाढी पूर्ण वाढलेली अंगात चौकडी शर्ट निळ्या कलरचा पॅन्ट, पायात काळ्या रंगाची स्लीपर चप्पल घातलेली आहे. अशा वर्णनाचा इसम कोणाला आढळून आल्यास धाड पोलिस स्टेशन विंâवा पोलिस निरीक्षक अनिल पाटील मो. ९९२२२७६१५२ व सहाय्यक फौजदार सुरेश मोरे मो. ९४२१३९३६१७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.