पिं.खुटा येथील विवाहितेच्या आत्महत्येचा आजीने केला पर्दाफाश..!! पतीसह सासु-सासऱ्यावर 306 चा गुन्हा दाखल!

648

मोताळा(BNUन्यूज) मलकापूर तालुक्यातील तथा बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या पिं.खुटा येथील उर्मिला उमाळे या 19 वर्षीय विवाहितेने 19 नोव्हेंबर रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती. मृतकाचा पती सागर उमाळे याच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु सदर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून आजीने सदर प्रकरणाचा पर्दाफाश करीत नात उर्मिलाने सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद 21 नोव्हेंबर रोजी दिल्याने सासू, सासरे व पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवीचे कलम 306, 34 नुसार दाखल करण्यात आला आहे.

मलकापूर तालुक्यातील पिं.खुटा येथे सौ.उर्मिला सागर उमाळे या 19 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी विवाहितेचा पती सागर पुंजाजी उमाळे याने बोराखेडी पोस्टे.ला फिर्याद दिली होती. सदर फिर्यादीवरुन आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु 21 नोव्हेंबर रोजी मृतक उर्मिला उमाळे हीची आजी सौ.बेबाबाई तानाजी तायडे रा.पहुरपुर्णा ता.शेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा संदीप हा चारवर्षापुर्वी मरण पावला त्याची पत्नी सुध्दा 10 वर्षापुर्वी बाळंतपणामध्ये मरण पावलेली आहे. त्यांना उर्मिला, आदित्य, शिवानी असे तीने मुले आहेत. त्यांची नात उर्मिला हीने मलकापूर तालुक्यातील सागर ऊर्फ संगीत उमाळे याच्याशी सन 2022 मध्ये पळून जावून प्रेमविवाह केला होता. उर्मिला दिवाळी सणाअगोदर माहेर आली होती, त्यावेळी तीने पती सागर काहीच काम करीत नाही, दारु पितो व तीला उर्मिलाला मिळणारे निराधाराचे पैसे बँकेतून काढून आणण्यासाठी त्रास देतो, नाही म्हटले तर भांडण करुन मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देतो तसेच सासु-सासरे तू आमच्या मुलाला फसविले, तु त्याच्या पाठीमागे लागून आली असे म्हणत सासू सौ.प्रर्मिला पुंजाजी उमाळे, सासरा पुंजाजी हरीभाऊ उमाळे हे नेहमी शिवीगाळ करुन त्रास देत असल्याचे उर्मिलाने सांगितले होते. त्यानंतर नात उर्मिलाला समजावून सांगून सासरी पाठविले होते. पोलिसांनी 20 नोव्हेंबर रोजी फोन निरोप दिला की, उर्मिलाने गळफास घेवून आत्महत्या केली, तुम्ही जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे या असे सांगितले, तेथे जावून पाहिले असता ती मरण पावलेली दिसली. उर्मिलाने तीचे सासू, सासरे व नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याच्या बेबाबाई तायडे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी उर्मिलाचा पती सागर ऊर्फ संगीत उमाळे, सासरा पुंजाजी उमाळे, सासू सौ.प्रर्मिला उमाळे या आरोपीविरुध्द बोराखेडी पोस्टे.ला भादंवीचे कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय. अनिल भुसारी हे करीत आहेत.

सागर उमाळेने केला होता बनाव..
पती सागर उमाळे याने फिर्याद दिली होती की, त्याची पत्नी सौ.उर्मिला उमाळे ही घराचे टीनपत्राला गळफास घेवून लटकलेली दिसली. त्यानंतर दरवाज्याची कडी काढून सागर व त्याचे वडील पुंजाजी उमाळे या दोघांनी तीला खाली उतरवून खात्री केली असता ती मृत झालेली आढळली, अशी फिर्याद बोराखेडी पोस्टे.ला दिली होती. यावरुन बोराखेडी पोस्टे.ला मर्ग ५६/२०२२ कलम १७४ जाफौ दाखल करण्यात आला होता. परंतु आजीच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी आरोपी पतीसह, सासू,सासरे यांच्याविरुध्द भांदवीचे कलम 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.