तेजस शिराळचे नीट परिक्षेत सुयश.. माजी राज्यमंत्री आ.डॉ.शिंगणेंनी केले कौतूक

437

मोताळा (BNU न्यूज)मोताळा तालुक्यातील टाकळी (वा) येथील चंद्रकांत शिराळ यांचे सुपूत्र तेजस शिराळ या विद्यार्थ्यांने नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन करीत मोताळा तालुक्याचे नाव बुलढाणा जिल्हयात झळकविले आहे. त्याला नीट परिक्षेत 602 मार्क मिळाले असून त्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरली आहे.

ग्रामीण भागातील तेजस शिराळने उंच भरारी घेत नीट परिक्षेत 602 मार्क मिळविल्याबद्दल त्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यख Adv.नाझेर काझी, प्रसेनजीत पाटील, माजी आ.नानाभाऊ कोकरे, Adv.साहेबराव सरदार, नरेश शळके, राकाँ.महिला जिल्हाध्यक्षा अनुजाताई सावळे यांनी त्याचे 13 सप्टेंबर रोजी त्याचे कौतूक करुन अभिनंदन केले.
तेजसचे प्राथमिक शिक्षण सहकार विद्या मंदीर मोताळा येथे तर इयत्ता 5 ते 10 वी पर्यंतचे शिक्षण शारदा ज्ञानपीठ बुलडाणा, 11 ते 12 वीचे शिक्षण उच्च माध्यमिक विद्यालय कासमपूरा ता.पाचोरा जि.जळगाव येथे झाले आहे. त्याचे मोताळा येथील डॉ.खर्चे, डॉ.रविंद्र महाजन, डॉ.काळे, डॉ.भरत सपकाळ, डॉ.चव्हाण यांनी स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.