आत्याच्या घरी पाहुणी आलेल्या 30 वर्षीय विवाहितेची आत्महत्या 

408

बुलढाणा तालुक्यातील धाड येथील घटना

बुलढाणा(BNUन्यूज) आत्याच्या घरी आलेल्या एका 30 वर्षीय विवाहितेने आत्या बाहेर सामानासाठी गेली असता ओसरीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास धाड येथे घडली. सदर विवाहीतेने आत्महत्या का केली, हे मात्र समजू शकले नाही.

बुलढाणा तालुक्यातील धाड येथे यमुनाबाई दांडगे यांच्या घरी आज 25 ऑक्टोबर रोजी रहीमाबाद ता.सिल्लोड येथील त्यांची भाची वर्षा उर्फ रोहीणी समाधान मोरे (वय 30) पाहुणी म्हणून आली होती. यमुनाबाई दांडगे ह्या सामान आणण्यासाठी बाहेर गेल्या असता, दांडगे यांच्या धाड येथील लालबंदी गायीचे गोठण परिसरात रोहिणी हीने आत्याच्या घराच्या ओसरीमध्ये लावलेल्या लाकडाला ओडणीच्या साह्याने गळफास लावुन आपली जीवनयात्रा संपवली. काही वेळानंतर मृतकाची आत्या यमुनाबाई दाडंगे घरी आल्यानंतर दरवाजा आतून बद असल्याने त्यांनी आवाज दिला, मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी शेजारच्या नागरिकांनी ओसरीच्या दरवाजातून आत पाहिले असता रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. धाड पोलीसात माहिती देऊन पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन रोहिणीचा मृतदेह पोस्ट मार्टमकरीता धाड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मृतक रोहिणीचे माहेर धाड जवळचे मोहोज असून तिचे सासर हे सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद  येथे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मृतक विवाहितेचा पश्चात  एक मुलगा व एक मुलगी असुन तीने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होवू शकले नाही. पुढील तपास धाड पोलिस करीत आहे. (फोटो घटनेतील नसून संग्रहीत फोटो आहे)