शिंदे सरकारचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 3 हजार 502 कोटींचे पॅकेज बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 8 कोटींची मदत

950

जून ते ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मिळणार मदत!
प्रविण जवरे मो.09922765076

बुलढाणा(BNU न्यूज) कधी ओळा, दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात भरडल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होत आहे. कर्ज कसे फेडावे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेतच अनेक शेतकरी आत्महत्या करीत आत्महत्येच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवसेंनदिवस त्याचा आकडा वाढत आहे. जगाचा पोशींदा आजरोजी देशोधडीला लागला आहे. जून ते ऑगस्ट 2022 मध्ये राज्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे राज्यामध्ये 2765727.00 शेतकऱ्यांचे एकूण 2381920.80 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्या शेतकऱ्यांना 344525.55 लक्ष रुपये तर अतिवृष्टी व पूरपरिस्थीती जमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5645.66 लक्ष अशी एकूण 3 हजार 501 कोटी 71 लक्ष 21 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 10998 शेतकऱ्यांचे 6009.68 हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले असून त्यांना 8 करोड 23 लक्ष 83 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून त्याला शासनस्तरावरुन मान्यता देण्यात आली आहे.

जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात 33 जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पुरपरिस्थीतीमुळे सार्वजनिक मालमत्ता/शेतीपिकांच्या नुकसानीची मदत देण्यासाठी 22 ऑगस्ट 2022 च्या शासन आदेशान्वये विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. विभागीय आयुक्तांकडून जुलै ते ऑगस्ट 2022 पर्यंतचे प्रस्ताव शासनाला 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान प्राप्त झाले होते. त्या शेतकऱ्यांना शेतपीक व शेतजमीने नुकसान देण्यासाठी शासनस्तरावरुन 3 हजार 501 कोटी 71 लक्ष 21 हजार रुपयांची मदत जाहीर करुन त्याला 8 सप्टेंबर रोजी मंजूरात देण्यात आली आहे. सदर मदत शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे. जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये अमरावती विभागात 792122.00 एवढ्या शेतकऱ्यांचे 795823.78 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते, त्या शेतकऱ्यांना 119676.66 लक्ष रुपयांची एवढी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात जिरायत क्षेत्र, आश्वासित सिंचनाखालील क्षेत्र, बहुवार्षीक पिकाखालील क्षेत्रातील 291919 शेतकऱ्यांचे 308292.74 एवढ्या हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले होते, त्यांना 53314.65 लक्ष रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात 104888 शेतकऱ्यांचे 90665.29 एवढ्या क्षेत्रावरील नुकसान झाले होते, त्यांना 12362.88 लक्ष रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात 378461 शेतकऱ्यांचे 389558.35 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले होते, त्यांना 52998.79 लक्ष रुपयांची तर बुलडाणा जिल्ह्यातील 10998 शेतकऱ्यांचे 6009.68 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले होते, त्यांना 823.83 लक्ष रुपयांची मदत, वाशिम जिल्ह्यात 5856 शेतकऱ्यांचे 1297.72 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले हेाते, त्यांना 176.51 लक्ष रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे अमरावती विभागात 10328 हेक्टर क्षेत्राचे नुकसान
जून ते ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिन वाहून व खरडून गेल्यामुळे तसेच अधिक जाडीचा गाळ साचल्याने अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यात 881.5 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले हेाते. तर अधिक जाळीचा गाळ साचल्याने 4707..55 एवढे क्षेत्र बाधीत झाले होते, त्यांना 904.88 लक्ष रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात 1724.4 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते, त्यासाठी 646.65 लक्ष रुपये, यवतमाळ जिल्ह्यात 3011.42 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते, त्यासाठी 605.16 लक्ष रुपये, बुलडाणा जिल्ह्यात 3.35 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले होते, त्यासाठी 1.26 एवढी मदत जाहीर करण्यात आली आहे.

अशी मिळेल वाढीव दराने मदत..
जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रचलीत दरानुसार 2 हेक्टरपर्यंत 6800 रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येत होती, आता त्यामध्ये वाढ करण्यात आली 3 हेक्टरपर्यंत मर्यादा ठेवण्यात आली असून आता प्रति हेक्टर 13600 रुपये मदत मिळणार आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 13500 रुपये होती, ती वाढवून त्याची मर्यादा आता 3 हेक्टरपर्यंत करण्यात आली असून प्रति हेक्टर 27000 हजार मदत मिळणार आहे.
बहुवार्षीक पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर 18000 हजार मदत देण्यात येत होती, ती वाढवून तिची मर्यादा 3 हेक्टर पर्यंत करण्यात आली असून प्रतिहेक्टर 36000 हजार रुपये करण्यात आली आहे.
(प्रविण जवरे हे बुलडाणा न्यूज अपडेटचे व्यवस्थापकीय संपादक आहेत.)