बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील सहकार्य गणेश मंडळाने पटकाविला 25 हजाराचा जिल्हास्तरीय पुरस्कार!

171
उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना पुरस्कार घोषित
चिखली(BNUन्यूज) मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निर्देशानुसार यावर्षी 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या गणेशोत्सवातील उत्कृष्ट गणेश मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले होते. यामध्ये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार शासनस्तरावरुन नुकतेच घोषीत करण्यात आले, यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील सहकार्य गणेश मंडळाने 25 हजार रुपयांचा जिल्हास्तरीय पुरस्कार पटकाविला आहे.

गणेशोत्सव उत्कृष्ट पुरस्कार निवडण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समिती मार्फत जिल्ह्यातील एका मंडळाची निवड करण्यात आली होती. राज्यस्तरीय समितीने जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रत्येक एक अश्याप्रकारे एकूण 36 उत्कृष्ट गणेश मंडळातून प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांची शिफारस करण्यात आली. राज्यस्तरीय प्रथम क्रमांक 5 लक्ष, द्वितीय 2.5 लक्ष तर तृतीय पुरस्कार 1 लक्ष तर 33 जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 25हजार व प्रमाणपत्र असे बक्षीसांचे स्वरुप होते. यामध्ये राज्यस्तरीय प्रथम 5 लक्ष रुपयांचे बक्षीस श्री खडकेश्वर म.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पातूर अकोला यांना तर द्वितीय 2.5 लक्ष रुपयांचे बक्षीस सुवर्ण युग तरुण मंडळ, शेवाळे गल्ली ता.पाथर्डी जि.अहमदनगर यांना तर तृतीय 1 लक्ष रुपयांचे बक्षीस स्वप्नाक्षय मित्रमंडळ अंधेरी, मुंबई उपनगर यांना देण्यात आले. तर जिल्हास्तरीय 33 पुरस्कारामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील सहकार्य गणेश मंडळ, यांना 25 हजाराचे जिल्हास्तरीय पुरस्कार घोषीत करण्यात आले आहे.(फोटो-संग्रहीत)