सावरखेड(नजिक) येथे 5 दिवसांपासून लाईटच नाही; काँग्रेस सेवादलचा आंदोलन छेडण्याचा इशारा !

573

चिखली(BNUन्यूज) सरकारकडून गोरगरीबांना 15 रुपयांत विद्यूत मिटर देवून गावोगावी अभिनव उपक्रम राबविण्यात आला तर आता मात्र चिखली तालुक्यातील सावरखेड नजिक गावामध्ये महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जळालेले रोहित्र बसविण्यात न आल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली आहे. सदर लाईट तात्काळ सुरु करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदेश सरचिटणीस रविंद्र डाळीमकर यांनी 10 ऑक्टोबर रेाजी अधिक्षक अभियंता बुलढाणा यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

चिखली तालुक्यातील सावरखेड(नजीक) येथे गेल्या पाच दिवसांपासून गावठाण रोहित्र जळाल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पिठाची गिरणी बंद असल्यामुळे नागरिकांचे जनजिवन होवून जीवन जगणे कठीण झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास, वयोवृध्दांना रात्री डांसामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक महावितरणच्या अधिकाऱ्यांशी वारंवार भ्रमणध्वनी व गावकऱ्यांनी कळवून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विचू, काटा यामुळे नागरिकांना भिती निर्माण झाली आहे. सदर सारखेड(नजीक) परिसरातील गावठाण विद्युत रेाहित्र तात्काळ बसविण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा म.प्र.काँगेस सेवादलचे राज्य सरचिटणीस रविंद्र नारायणराव डाळीमकर यांच्यावतीने बुलढाणा येथील अधिक्षक अभियंता यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.