आडविहीर येथे शेतकऱ्याची आत्महत्या

482

buldanannewsupdate.com 
मोताळा(18Dec.2022) मृत्यू केंव्हा आणि कधी येईल हे सांगत येत नाही. दिवसभर लग्नाच्या पंगतीत वाढले, अन् 17 डिसेंबरच्या सायंकाळी 7.15 वाजेच्या दरम्यान घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना मोताळा तालुक्यातील आडविहीर येथे उघडकीस आली. मृतकाचे नाव गजानन निवृत्ती नाफडे असे आहे.

आडविहीर येथील युवा शेतकरी गजानन निवृत्ती नाफडे (वय 36) यांच्याकडे आडविहीर शिवारात 10 एकर सामाईक शेती आहे. गजानन नाफडे हा शेतकरी अनेक दिवसापासून वैफल्यग्रस्त झाला होता. तो अनेकवेळा जीवाचे बरेवाईट करीन असे सांगत होता. गजानन नाफडे याने 17 डिसेंबरच्या सायंकाळी 7.15 वाजेच्या दरम्यान घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.