शेगाव येथे चोरी; 44 हजाराचे दागीणे लंपास! अज्ञात चोरट्याविरुध्द शेगाव पोस्टे.ला गुन्हा

173

शेगाव (BNUन्यूज)- खरचं चोरटे खूप डोके लढवितात, हे सर्वांनाच चांगले माहिती आहे. चोरट्याने शेगाव येथील दसरा नगर येथे राहणाऱ्या भागवत वक्टे यांच्या घरातील सोन्याचे 44 हजार रुपयांचे दागीणे लंपास केल्याची घटना 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत शेगाव पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेगाव येथील दसरा नगरामध्ये राहणारे भागवत वक्टे यांना वडाळी ता. नांदूरा येथे जायचे असल्याने त्यांनी घरातील सोन्याचे दागीणे एका प्लास्टीकच्या पिशवीत बांधून सज्याच्या मागे ठेवले होते, दरम्यान 12 नोव्हेंबर रोजी घरातील गहू गच्चीवर वाळू घालण्यासाठी टाकले होते. घरातील सर्वजण आपआपल्या कामावर गेले होते, दरम्यान फिर्यादींची पत्नीने घराचा दरवाजा उघडा टाकल्याची संधी साधून चोरट्याने डब्ब्यातील सोन्याचे दागीणे गोफ 10 ग्रॅम किंमत 20 हजार रुपये, अंगठी 4 ग्रॅम 8 हजार रुपये, गहूमनी पोथ 7 ग्रॅम 14 हजार रुपये, 1 ग्रॅम पदक 2 हजार असे एकूण 44 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने चोरुन नेल्याची फिर्यादी भागवत वक्टे यांनी शेगाव पोस्टे.ला दिली. सदर फिर्यादीवरुन शहर पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवीचे कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.