पत्नीला कार शिकविणे शिक्षकाला चांगलेच महागात पडले! कार विहिरीत पडल्याने पत्नी, मुलगी व बचावासाठी उतरलेला युवकाचाही मृत्यू!

513

बुलढाणा(BNUन्यूज) पत्नीला कार शिकविणे शिक्षकाला चांगलेच महागात पडले असून कारचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला जात असलेल्या विहिरीत कोसळल्याने यामध्ये पत्नी व मुलीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना दे.राजा चिखली रेाडवर जात असतांना आज गुरुवार 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. तर बचावासाठी विहिरीत उतरलेल्या 28 वर्षीय पवन पिंपळे या युवकाचा सुध्दा गाळात फसल्याने मृत्यू झाला आहे. अमोल मुरकुटे या शिक्षकावर एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. .

सिंदखेडराजा तालुक्यातील डोरवी येथील रहिवासी व शिक्षक म्हणून अमोल मुरकुटे नोकरीला असून ते देऊळगावराजा येथील रामनगरमध्ये राहतात. दिवाळीची सुट्टी असल्याने पत्नी स्वाती मुरकुटे यांना कार शिकवत होते. त्यांच्यासोबत मुलगी सिद्धी मुरकुटे ही सुद्धा होती. चिखली रोडवर जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार खोल विहिरीमध्ये जावून पडली. त्यावेळी अमोल मुरकुटे खिडकीमधून बाहेर आले, मात्र स्वाती मुरकुटे व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा पाण्यामध्ये दुदैवी मृत्यू झाला. अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विहिरीतील पाणी बाहेर काढत असतांना शोध घेतो म्हणून उडी मारणाऱ्या दे.राजा येथील पवन पिंपळे या 28 वर्षीय युवकाचा सुध्दा मृत्यू झाला आहे. तर शव बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरेल्या ज्ञानेश्वर शिंगणे या युवकाला फिट आल्याने तो बेशुध्द पडला, त्याला वेळीच बाहेर काढून उपचार मिळाल्याने तो बचावला आहे. अग्निशमन, पोलीस दल व इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल असून पोलीस निरीक्षक जयवंत सातव, पोलीस कर्मचारी तहसीलदार श्याम धनमने, नगर पालिका कर्मचारी घटनास्थळी होते. 7 तासानंतर मायलेकीचा मृतदेह बाहेर काढण्यात औरंगाबाद येथील अग्नीशामक दलाला यश आले आहे.

देव तारी त्याला कोण मारी..
म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, याचाच प्रत्येय आला आहे. शिक्षक अमोल मुरकुटे यांनी 7 वर्षीय स्वराज शाळेत सोडून ते पत्नीला कार शिकविण्यासाठी गेल्याने दैव बलवत्तर असल्याने शाळेत असलेल्या स्वराजचे प्राण वाचले.