पिं.सराई भारज चौफुलीवर भिषण अपघात; 1 गंभीर, 14 जखमी!

430

जखमीवर बुलढाणा व चिखली रुग्णालयात उपचार सुरु

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (Date.25 Jan.2023) तालुक्यातील पिंपळगाव सराई ते चौफुली भारज येथे छोटा हत्ती व इर्टिगा या दोन गाड्यांची आज 25 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास समोरासमोर भिषण धडक झाली. या धडकेत 1 जण गंभीर जखमी झाला तर 14 नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना चिखली व बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे. यातील सखाराम नवघरे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

प्राप्त माहितीनुसार एम.एच.37 पी.0667 क्रमाकांचा छोटा हत्ती आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास पिंपळगाव सराईकडे जात होता. तर एम.एच.42 के.0780 ही इर्टीगा ही गाडी धाड भारज सैलानीकडे जात होती, दरम्यान या दोन्ही वाहनांची पिंपळगाव सराई भारज चौफुलीवर अमोरासमोर भिषण धडक झाली. या धडकेत सखाराम नवघरे पांग्री नवघरे जि.वाशीम हे गंभीर झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व रायपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचवून ॲम्बुलन्सने चिखली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुर्यभान खडसे , द्वारकाबाई वानखडे, कमलबाई गुडदे, मिनाबाई खडसे, शोभाबाई राऊत, लता खडसे, सिंदुबाई खडसे, वच्छलाबाई इंगोले, शशिकला ताजने, लताबाई खडसे हे जखमी झाले असून त्यांना चिखली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बुलढाणा तालुक्यातील एकाच घरातील जगन्नाथ गव्हाणे, लताबाई गव्हाणे, अशोक गव्हाणे, पार्वती गव्हाणे, रामकोर गव्हाणे, सुभद्राबाई गव्हाणे,कस्तुराबाई गव्हाणे, भारत गव्हाणे यांना बुलढाणा येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोस्टे. ठाणेदार राजवंत आठवले यांच्या आदेशान्वये पोहेकॉ.अमोल गवई, पोहेकाँ.शांताराम जाधव, पवार, शितोळे, प्रमोद लंवगे, चितळे हे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे. वृत्तलिहीपर्यत रायपूर पोस्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.