नाचण्यातील धक्का बुक्कीचा वाद विकोपाला गेला; तिघांनी एकाला लोखंडी रॉडने बेदम चोप दिला !

517

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (11 Mar.2023) खरंच कुठे काय हाईल, अन् काय होणार नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे. हाणामारी व रपारपी होण्यासाठी कोणतेही कारण निमित्त कारणीभूत ठरते. 10 मार्च रोजी शिवजयंती उत्सवात नाचता-नाचता मुलाला धक्काबुकी केली, असे सांगण्यासाठी गेलेल्या वडिलाला तिघा बापलेकांनी मारहाण केल्याची घटना मोताळा येथील वृंदावन नगर येथे 10 मार्चच्या रात्री 8 वाजता घडली. याबाबत एकाच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे की, मोताळा शहरामध्ये शिवजयंती मिरवणुकी दरम्यान नाचता-नाचता त्यांच्या मुलाला एका मुलाने धक्काबुक्की केली, सदर घटना समजावून सांगण्यासाठी फिर्यादी मारहाण करणाऱ्या मुलाच्या वडिलांना  गेला असता त्यांच्याशी वाद घालून लोंबाझोंबी व शिवीगाळ करीत एका मुलाने फिर्यादीचे दोन्ही हात धरुन दुसऱ्या एका मुलाने त्याचे हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीचे पाठीवर व खांद्यावर मारहाण करीत खाली पाडून लाथाबुक्कांनी मारहाण केली.  मारहाण करणाऱ्या मुलाच्या वडिलाने सुध्दा हातातील मार्बलच्या कडप्प्याने फिर्यादीचे डोक्यावर मारुन जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्यावर श्री प्रथमेश हाँस्पीटल, मोताळा येथील डॉ. तेजल काळे यांनी प्राथमिक उपचार करुन पुढील सीटीस्कॅन करण्यासाठी बुलढाणा येथे पाठविले आहे. फिर्यादीच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला आरोपी दोन मुलांसह वडिलांवर अप.क्र. 115/2023 भादंवीचे कलम 324,323,504,506,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास विजयकुमार घुले हे करीत आहेत.