बोराखेडी पोलिस अ‍ॅक्शन मोडवर; खैरा, जयपूर व बोराखेडी गावात जुगारावर धाड !

610

52 हजार 810 रुपयांचा जुगार पकडला: 17 जणांवर कारवाई

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (17 Apr.2023) बोराखेडी पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आली असून त्यांनी तीन ठिकाणी जुगार अड्डयावर धाड टाकून 52 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 17 जुगाऱ्यांना पकडले आहे. सदर धडाकेबाज कारवाई बोराखेडी पोलिसांनी 16 एप्रिल रोजी दुपारपासून ते सायंकाळपर्यत केली. या कारवाईमुळे जुगाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून इतर अवैध धंद्यावर बोराखेडी पोलिस कारवाई केंव्हा करतील, असा प्रश्न सुज्ज्ञ नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.

प्राप्त माहितीनुसार बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या खैरा ता.नांदुरा येथे खैरा शिवारात जुगारा चालू असल्याची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी 16 एप्रिल रोजी खैरा शिवारातील धिरज मापारी यांच्या शेतात धाड टाकली. यावेळी आरोपी हे एक्का बादशहा जुगार खेळ पैश्याच्या हारजीतवर खेळतांना आढळले. आरोपी धिरज नारायण मापारी, सुभाष बद्रीनाथ राठी, रामदास आनंदा मापारी, रमेश भाऊराव मापारी, गणेश रमेश मापारी, संजय हरीभाऊ कावणे सर्व रा.खैरा यांना पकडून त्यांच्याकडून नगदी 13 हजार 300 रुपये अंगझडतीत तर 380 रुपये पत्त्याच्या डावात असा एकूण 13 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल बोराखेडी पोलिसांनी जप्त केला आहे. पोकाँ.श्रीकांत चिंचोले यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला भादंवीचे कलम 12(अ)म.जु.का.1887 अन्वये कारवाई करण्यात आली.

तर दुसऱ्या कारवाईमध्ये मोताळा तालुक्यातील जयपूर शिवारात प्रल्हाद जुनारे पाटील यांच्या शेतात सुरु असलेल्या डावात 32 हजार 240 अंगझडतीत तर 1680 रुपये नगदी मुद्देमाल जप्त करुन प्रल्हाद पांडुरंग जुनारे तांदुळवाडी, शंकर नागो बगाडे लासुरा ता.मलकापूर, देवानंद अर्जुन जाधव हतेडी ता.बुलढाणा, संदीपकुमार निनाजी भारसाकळे टाकरखेड ता.नांदुरा, मुकूंद प्रल्हाद नारखेडे निमखेड ता.मलकापूर, श्रीकृष्ण काशीराम बगे हिवरा ता.खामगाव, शिवाजी शंकर जाधव टाकरखेड ता.नांदुरा, संजय अजाबराव घाईट सावळी ता.नांदुरा यांना पकडले त्यांच्यावर पोना.रमेश नरोटे यांच्या फिर्यादीवरुन कलम 12(अ)म.जु.का.1887 अन्वये कारवाई करण्यात आली. तर तिसऱ्या कारवाईमध्ये बोराखेडी पोलिस स्टेशनच्या बाजुला असलेल्या एका वाड्यात जुगार अड्डयावर धाड टाकली असून त्यामध्ये 4 जुगाऱ्यावर कारवाई करुन त्यांच्याकडून 2170 रुपये अंगझडतीत तर खेळातनगदी 60 व पत्ता 20 असा एकूण 2250 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामधील आरोपी सुनिल मोरे, अनिल फेरवानी, प्रभाकर देवकर, तोतारा हांडे सर्व रा.बोराखेडी यांच्यावर पोकाँ.सदानंद हाडे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला भांदवीचे कलम 12(अ)म.जु.का.1887 अन्वये कारवाई करण्यात आली.