उध्दव ठाकरे शिवसेना गटाच्या  तालुका प्रमुख व युवासेना जिल्हा उपप्रमुखाला मारहाण!

1177

बुलडाणा मोताळा रोडवर भरदुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास अज्ञातांनी दिला चोप!

बुलढाणा (BNUन्यूज)- घाटाखालील ठाकरे गट शिवसेनेच्या तालुका प्रमुख अनंता दिवाणे व युवासेना जिल्हाप्रमुख शुभम घोंगटे यांना मुर्ती फाट्याजवळ आज मंगळवार 15 नोव्हेंबर रोजी अज्ञातांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमीक उपचार करुन त्यांना लध्ढड हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोताळा तालुका प्रमुख अनंता दिवाणे व युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे हे चिखली 26 नोव्हेंबर रोजी चिखली येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेच्या नियोजनच्या बैठकीसाठी बुलढाणा येथे गेले होते. बैठक आटोपल्यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल घाटे हे त्यांच्या वाहनाने आले तर ते शुभम घोंगटे व अनंता दिवाणे हे दुचाकीने येत असतांना दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास मोताळ्याकडे येत असतांना मुर्ती फाट्याजवळ त्यांना एका चारचाकी गाडीतून काही जणांनी त्यांना अडविले तर काहींनी लोखंडी रॉडने रपारप मारहाण केली. काही समजण्याआधी झालेल्या हल्ल्यामुळे दोघेने जीव वाचविण्याच्या आकांताने सैराभैर शेतामध्ये पळू लागल्याने अज्ञात मारेकरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सायंकाळी 5.50 वाजेच्या सुमारास त्यांना लध्ढड हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती चांगली असून अनंता दिवाणे यांच्या हाताला फॅक्चर झाल्याची माहिती आहे. वृत्तलिहेपर्यंत बोराखेडी पोस्टे.गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.