20 वर्षीय युवकाचा धरणात बुडून मृत्यू

867

मोताळा तालुक्यातील मुर्ती येथील हरमोड धरणातील दुदैवी घटना

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (19Apr.2023) मोताळा तालुक्यातील मुर्ती फाट्यावर असलेल्या हरमोड धरणात एका 20 वर्षीय युवकाचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना 18 एप्रिलच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव अभिषेक भारत आडवे असे आहे.

बुलढाणा तालुक्यातील माळविहीर येथील आडवे कुटुंबीय मागील तीन पिढ्यांपासून वाघजाळ फाटा येथील एका शेतात वास्तव्यास आहे. आडवे कुटुंबीयांना वारुळी शिवारात ई-क्लासची 5 एकर शेती मिळालेली आहे. त्या शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अभिषेक हा घरी आढळला नसल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो रात्री उशीरापर्यंत आढळून आला नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला असता 18 एप्रिलच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास त्यांचे त्याचे कपडे हरमोड येथील तलावाजवळ दिसले, त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला. त्याला रात्री उशीरात पोकलॅण्डच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्याच्या पश्चात 2 भाऊ व आई असा बराच मोठा आप्त परिवार आहे. अभिषेकच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.