सैलानी येथे कारच्या धडकेत युवक ठार

432

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (18 Mar.2023)
मृत्यू अटळ आहे, परंतु तो केव्हा आणि कधी येईल हे सांगता येत नाही. रायपूर येथे बसस्टॅण्डवर हमाली करणारा युवक आज 18 मार्च रोजी सैलानी येथे गेला होता. तेथे सैलानी बाबाच्या झिऱ्याच्या रस्त्यावर त्याच्या अंगावर एका कारचालकाने कार घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सायंकाळच्या 5 वाजेच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव गजानन अहिर असून तो रायपूर येथील रहिवासी असल्याचे समजते.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायपूर पोस्टे.अंतर्गत असलेल्या सैलानी येथे रायपूर येथील 40 वर्षीय युवक गजानन अहिर हा काही कामास्तव गेला असता, आज शनिवार 18 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास त्याला सैलानी बाबाच्या झिऱ्याजवळ एम.एच-31 एफआर-9257 या कारचालकाने बेफाम कार चालवून त्याच्या अंगावर गाडी घातली, यामध्ये गजानन अहिर हा युवक जागीच ठार झाला. कारचा चालक मात्र कार घटनास्थळी सोडून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोस्टे. हेकाँ.अमोल गवई, श्रीकांत चिटवार, पवार यांनी घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला. रात्री उशीरापर्यंत रायपूर पोस्टे.गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. कारच्या चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.