दुचाकीची समोरासमोर धडक; दोन युवक ठार !

3414

बुलढाणा तालुक्यातील सावळी गावाजवळील घटना

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा(30.May.2023)सध्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघाताच्या प्रमाणात सुध्दा मोठी वाढ झाली आहे. अनेक अपघात होतात, असाच एक मोठा अपधात आज मंगळवार 30 मे रोजी सायंकाळी 6.30 ते 7 वाजेच्या दरम्यान धाड-चांडोळ रस्त्यावर सावळी गावाजवळ घडला. यामध्ये दोन युवक जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार गणेश मंगलसिंग पाकळ (वय 26) रा.चांडोळ हा युवक धाड येथून आपल्या दुचाकीने घराकडे चालला होतो. दरम्यान आज सायंकाळी 6.30 ते 7 वाजेच्या दरम्यान राहूल सखाराम जेऊघाले रा.धामणगाव धाड हा जावळ्याच्या कार्यक्रमासाठी जाफराबाद तालुक्यातील साखळेडऊ येथे परत येत असतांना धाड-चांडोळ रस्तावर सावळी गावाजवळ दोघांच्या दुचाकीची समोरासमोर भिषण धडक झाली. धडक एवढी भिषण होती की, दोघेही रोडवर पडून डोक्याला जबर मार लागल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने दोघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघात ग्रस्तांना मदत केली. धाड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.