लोणार येथे चोरटे झाले सक्रीय; 32 हजाराचे दागिणे केले लंपास!

49

BNUन्यूज नेटवर्क
लोणार(20JULY.2023) येथील नवी नगरी येथे चोरटे ‘ब्रेक के बाद’ सक्रीय झाले असून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या 32 हजाराच्या दागिण्यावर डल्ला मारुन दागीणे लंपास केल्याची घटना 18 जुलै रोजी घडली आहे, याबाबत लोणार पोस्टे.अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख अजिम शेख अब्दुल रहीम यांनी लोणार पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते नवी नगरी लोणार येथे राहतात. ते बाहेरगावी गेल्याची संधी पाहून चोरट्यांनी 17 ते 18 जुलैच्या दरम्यान त्यांच्या घरातील चांदीचे फुलजोडे 30 तोळे वजनाचे दागीणे 18 हजार रुपये, सोन्याची गहुमणी पोथ 4 हजार रुपये व नगरी 10 हजाराचे असे एकूण 32 हजार चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद 19 जुलै रोजी लोणार पोस्टे.ला दिली. सदर फिर्यादीवरुन पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवीचे कलम 380, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.