भोरसा-भोरसी येथील युवकाची राजूर घाटात आत्महत्या !

45

BNU न्यूज नेटवर्क
मोताळा (20 Sep.2023) चिखली तालुक्यातील भोरसा भोरसी येथील एका 26 वर्षीय युवकाने राजूर घाटातील खडकी शिवारात शिवसागवानच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 20 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. मृतकाचे नाव सुशिल कृष्णा गवई असे आहे.

प्राप्त माहितीनुसार भोरसा भोरसी येथील सुशिल गवई (वय 26) हा युवक 16 सप्टेंबर रोजी कोणाला न सांगता घरुन निघून गेला होता. त्याचा नातेवाईक व इतरत्र शोध घेतला, परंतु तो आढळून न आल्याने अमडापूर पोस्टे.ला मिसींग दाखल करण्यात आली होती. दरम्यान 19 सप्टेंबर रोजी सुशिल गवई याची पॅशन प्रो मोटार सायकल राजूर घाटात खडकी शिवारात उभी दिसल्याने त्याचा परिसरात शोध घेतला असता त्याचा मृतदेह शिवनसागाच्या झाडाला लटकलेला दिसून आला. अश्या मृतकाचे भाचे करण मोरे केळवद ता.चिखली यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे. सुशिलने आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास पोहेकाँ.कपिश काशपाग हे करीत आहेत.