तो मुतायला गेला; ते आले अन् गाडी घेवून गेले !

66

बुलढाणा(23Sep2023)चोरटे कशी चोरी करतील याचा नेम नाही.., असाच एक किस्सा बुलढाणा तालुक्यात उघडकीस आला. सुरेश टमाळे दवाखान्याचे कामे आटोपून घराकडे जात होते, दरम्यान देऊळघाट रोडवरील रोडच्या कडेला गाडी उभी करुन लघुशंकेला गेले. त्या चोरट्यांनी संधीचे सोने करीतदुचाकीला चाबी असल्याने त्यांनी गाडी चालू करुन घटनास्थळावरुन धूम ठोकली.

तालुक्यातील दहीद बु. येथील सुरेश टमाळे यांनी बुलडाणा शहर पोलिसात फिर्यादी दिली की, ते हिरो कंपनिची मोटार सायकल क्र. MH-28 BE.6801 हे 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता हे हॉस्पीटल येथे उपचार करुन दुचाकीने घरी जात असतांना जांभरूण गावाबाहेरील देऊळघाट रोडवरील पुलावरुन जात असतांना लघुशंकेसाठी खाली उतरले होते. गाडीची चाबी गाडीलाच राहिल्याने तेव्हढ्यात मोटार सायकलकडे येत असतांना 24 ते 25 वयोगटातील तीन अनोळखी मुलांनी त्यांची 35 हजाराची मोटार सायकल चालू करुन फुर्र..झाल्याच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवीचे कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.