जळगावच्या स्थागुशा पीआय बकालेचे मराठा समाजविषयी आक्षेपार्ह वक्तव्य! बकालेच्या निलंबनासाठी मराठा समाज आक्रमक

627

ऑडिओ क्लिप व्हायरल; एसपींनी केले बकालेला नियंत्रण कक्षात जमा

जळगाव (BNU न्यूज)- एका पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवरुन बोलतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले या बावळटाने मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. याची गंभीर दखल घेत पालिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी बकालेची तातडीने उचलबांगडी करुन त्याची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. या बकालेच्या वक्तव्याचा निषेध करीत मराठा समाज तसेच राजकीय संघटना आक्रमक झाल्या असून त्याचे निलंबन करण्याची मागणी मराठा समाज बांधवांकडून करण्यात आली आहे. या गंभीर घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे बाळवट पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हा एका पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवर बोलतांनाची संभाषणाची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडीयो क्लिपमध्ये किरणकुमार बकाले याने बोलतांना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. या ऑडीयो क्लिपबाबत तसेच प्रकाराची माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी गंभीर दखल घेत बकालेची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. योग्य ती चौकशी करण्यात येवून असून बकाले याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.

संजय राऊतनेही मराठा मूक मोर्चाची खिल्ली उडविली होती..
मराठा आरक्षणा संदर्भात मराठ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शांततेने मूक मोर्चे काढून आपल्या न्याय्य मागण्या सरकारकडे लावून धरल्या, मराठ्यांच्या शिस्तबंध्द मोर्चाचे संपूर्ण जगभर कौतूक झाले. आरक्षण मिळाले नाही, तो विषय वेगळा, परंतु त्यावेळी सामनामधून संजय राऊतने मराठ्यांच्या मूक मोर्चाची खिल्ली उडविली होती. आणि आता स्थागूशा पोलिस निरीक्षक बकाले याने सुध्दा मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या बकालेला फक्त नियंत्रण कक्षात जमा करुन फायदा होणार नसून त्याला निंलंबीत करण्यात यावे, यासाठी मराठाने समाजाने आक्रमक होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया एका मराठा समाजबांधवांने बुलडाणा न्यूज अपडेटशी बोलतांना व्यक्त केली.

बकालेवर थातूर मातूर कारवाई; मराठा समाज आक्रमक
मराठा समासाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची पोलीस सेवेतून बडतर्फ करून गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी मराठा समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक एखादा समाजाबद्दल अतिशय खालच्या पातळीवर आक्षेपार्ह वक्तव्य संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. एका अधिकाऱ्यांकडून सामाजिक न्यायाची व सुव्यवस्थेची काय अपेक्षा करता येईल. आपल्या पदाचा दुरुपयोग करून आक्षेपार्ह बोलल्याने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न बकालेने केला आहे. प्रशासनाने तातडीने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आणि त्याला समर्थन देणारे पोलीस कर्मचारी अशोक महाजन यांना त्वरीत कायमस्वरूपी पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात यावे, तीन दिवसात बकाले याचे निलंबन झाले नाही, तर दहा हजारापेक्षा जास्त नागरिकांचा मोर्चा पोलीस जळगाव पोलिस अधिक्षक कार्यालयावर घेवून जाणार असल्याचा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, विनोद देशमुख, उपमहापौर कुलभूषण पाटील, संतोष मराठे, मंगला पाटील, रेखा पाटील, मुकुंद सोनवणे, वाल्मिक पाटील, मुकुंद सपकाळे यांच्यासह मराठा समाज बांधव व मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.