मोताळ्यात चोरटे सक्रीय; दोन घरे फोडले; 3 लाखाचा मुद्देमाल लंपास !

60

चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान

मोताळा(13 नोव्हें.2023) चोरटे सक्रीय झाले असून त्यांनी आपला मोर्चा मोताळा शहरात वळविला असून दिवाळीच्या आदल्या दिवशी दोन घरे फोडून कपाटातील सोन्यासह रोख असा एकूण 2 लक्ष 94 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली. सदर चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

शहरात आतापर्यंत अनेक चोऱ्या झाल्या असून त्यामधील कित्येक चोरट्यांना पकडणे पोलिसांना शक्य झाले नसल्याने ते आजही बिनधास्तपणे ‘ना भय ना भिती’ याप्रमाणे फिरत आहे. चोरट्यांचे नेटवर्क पावर फुल्ल असल्याने चोरट्यांनी दिवाळीच्या आदल्या दिवशी धुमाकूळ घालीत शहरातील दोन ठिकाणी आपला मोर्चा वळवित वार्ड क्रमाक 8 मधील ओम चोपडे यांच्या घरातील 1 लक्ष 4 हजार 900 रुपये रोख तर दुसऱ्या घरातील सोन्याचे 76 ग्रॅम किमतीचे सोन्याचे दागिणे किंमत 1 लक्ष 90 हजार असा एकूण 2 लक्ष 49 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केला. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी, बोराखेडी ठाणेदार बळीराम गिते, सहाय्यक पोलिस निरिक्षक राजवंत आठवले यांनी भेट देवून पाहणी केली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेता येथे बुलढाणा डॉगस्कॉडला पाचारण करण्यात आले होते. यावेळी पोहेकाँ.गजेंद्रसिंग राजपूत व विलास पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी ओम चोपडे व आणखी एक अशा दोघांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवीचे कलम 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राजवंत आठवले हे करीत आहे.