मलकापूर-नांदुरा तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करा; अन्यथा शिवसेनो स्टाईलने आंदोलन छेडू-वसंतराव भोजने

91

मलकापूर((BNU न्यूज)- बऱ्याच दिवसापासून मलकापूर व नांदुरा तालुक्यात वीज पुरवठा वेळोवेळी खंडीत होत सुरू असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. सदर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीने कार्यकारी अभियंता मलकापूर यांना एका निवेदन देण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून खैरा व वडनेर भोलजी परिसरात दिवसभरात अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. या संदर्भात गावकऱ्यांच्या वतीने वीज वितरण कंपनीला अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही, याबाबत शाखा अभियंता यांना विचारले असता तो उडवा उडवीचे देतो व कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचे सांगत सांगून वेळ मारतो आहे. या सर्व बाबींना कंटाळून आज शिवसेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी मलकापूर यांना निवेदन देण्यात आले असून या नंतर जर वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा अभियंत्याला निवेदनाला देण्यात आला आहे. यावेळी वसंतराव भोजने जिल्हा प्रमुख शिवसेना, दिपक चांभारे पाटील तालुका प्रमुख, संतोषभाऊ दिघे, रविभाऊ सातव, राजूसिंग राजपूत, गजानन ठोसर, सोपानराव पाटील, दिनकरराव जुमडे, हरिभाऊ झालते, वैभव पाटील, अजय सोनवणे, अमित राजपूत, मयुर मंडवळे, मंगेश पाटील, बाळू भाऊ पोलाखरे, हसन अफसर खान, विशाल चांभारे, दिपक कोथलकर, समद कुरेशी, पांडुरंग चिम, रामराव तळेकर, संतोष पाटील यांच्यासह बाळू धामोडे उपस्थित होते.