तुटलेल्या विद्युत तारा न जोडल्यास आंदोलन छेडणार स्वाभिमानीचे मलकापूर विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना अल्टीमेटम!

149

गणेश वाघ
मलकापूर (BNU न्यूज)- वडोदा व शिरसोळी शिवारातील सिंगल फेज व शेतातील तुटलेल्या तारा तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.

मलकापूर तालुक्यातील वडोदा शिवारातील नागरिकांना व शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा खूप त्रास होत आहे. गेल्या काहि दिवसांपासून सिंगल फेजचा प्रश्न व शेतातील तारा तुटलेल्या आहेत. याबाबत अनेकवेळा तोंडी व लेखी स्वरूपात निवेदन देवून देखील ढेपाळलेल्या विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देवून येत्या दहा दिवसांत हा प्रश्न मार्गी न लावल्यास स्वाभिमानीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी स्वभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष निलेश नारखेडे, संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन शिंगोटे, शिरसोळीचे उपसरपंच अरविंद भोलवनकर, विष्णु भोलवनकर, योगेश सुरलकर, मोहन भोलवनकर, नीना नाफड़े, शिवाजी हिवाळे, विशाल भगत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.