नळगंगा अ‍ॅग्रो प्रोड्यूसर कपंनीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात.. कंपनीद्वारा वर्षभरात विविध प्रकल्प उभारले जातील-प्रविण जवरे

531

विशेष प्रतिनिधी-सुरेश तायडे
मोताळा(BNUन्यूज) नळगंगा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत औजारे, बँक गोडाऊन तसेच स्मार्ट प्रकल्प, ड्रोन फवारणी, माती परिक्षण केंद्र, सिंचन सुविधा केंद्र, कृषी सेवा केंद्र असे विविध उपक्रम कंपनीद्वारा वर्षभरात उभारले जातील, असे नळगंगा प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष प्रविण दिनकर जवरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला मार्गदर्शन करतांना सांगीतले.

नळगंगा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमीटेडच्या वार्षिक सभेचे शनिवार 17 सप्टेंबर रोजी संत तुकाराम दूध संकलन केंद्र मोताळा येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी जवरे बोलत हेाते. पुढे बोलतांना प्रविण जवरे यांनी कंपनीच्या मागील हंगामात कंपनीच्यावतीने 7751 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत ओैजारे बँक, गोडाऊन व स्मार्ट प्रकल्पातंर्गत शेतमाल खरेदी विक्री करीता प्रशस्त व्यवस्था कंपनीच्यावतीने करण्यात असून यावर्षी खरीप हंगामात कपंनीकडून सोयाबीन खरेदीला सुरुवात होणार असल्याचे अध्यक्षीय भाषणात जवरे यांनी सांगितले. यावेळी किटक नाशक तज्ज्ञ अनिल गाभणे यांनी कापूस व सोयाबीन पिकांसाठी कीड तसेच गुलाबी बोंडअळी, पातेगळ, फुलगळ व सतत होणाऱ्या पावसामुळे शेतीत करायचे नियोजन तसेच कापूस व सोयाबीन पिकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. तर डब्ल्यूआरएमएसचे राज्य व्यवस्थापक मनिष भानुसे यांनी हवानाच्या अंदाज तसेच कोणते पीक कोणत्या वेळेत घ्यावे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तर एचडीएफसी बँकेचे रुरल सेल्स मॅनेजर प्रदीप बोदडे यांनी शेतीसाठी पीककर्ज, ट्रॅक्टर तसेच इतर अवजारे खरेदीसाठी सुलभ कर्ज बँक शेतकऱ्यांना कसे उपलब्ध करुन देते याबद्दल मार्गदर्शन केले. बेसीकचे जिल्हा व्यवस्थापक गजानन खिरोडकर यांनी कंपनी सोबत भविष्यात करार करुन कश्या पध्दतीने काम केले जाईल, याबाबत मार्गदर्शन केले. कपंनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संचालक व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल पाटील, सुरेश तायडे, दिनेश चित्रंग, योगेश घोगले, करण राजपूत, आकाश सनिसे, अमोल जवरे यांनी परिश्रम घेतले. शेवटी कंपनीचे अध्यक्ष प्रविण जवरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाचा सांगता केली.