डीबी.पथकाने आवळल्या फरार आरोपीच्या मुसक्या

51

मलकापूर- चोरट्याचे नेटवर्क कितीही पावर फुल्ल असेलतरी ‘कानून के हाथ बहोत लंबे होते है!’ याची प्रचिती मलकापूर शहरात आली आहे. डीबी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शस्त्र अधिनियम गुन्ह्यातील 7 महिन्यापासून फरार आरोपी शेख तालीब शेख अहेमद (वय 25) व इतर गुन्ह्यातील एक अशा दोन आरोपींना 25 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.

मलकापूर शहर पोलिसांत दाखल शस्त्र अधिनियम मधील आरोपी शेख तालीब शेख अहेमद हा मागील सात महिन्यापासून फरार होता. डीबी.पथकाला तो मलकापूर शहरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन त्याला अटक करण्यात आली. तसेच मलकापुर शहर दाखल भादंवीचे कलम 461, 380 प्रकरणातील संशयी आरोपी गोविंदा दशरथ पेंटर उर्फ इंगळे रा. वाकोडी ता. मलकापुर याला पकडून त्याची चौकशी केली असता सदर गुन्हा त्यांनेच केल्याची कबुली दिल्याने निषन्न झाल्याने सदर गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाई शहर पोलिस करीत आहे. सदर कारवाई सपोनी करुणाशिल तायडे, पोकॉ. प्रमोद राठोड, पोकाँ. गोपाल तारुळकर, पोकाँ. संतोष कुमावत, पोका.आसिफ शेख, पोकाँ. ईश्वर वाघ, पोकॉ.प्रविण गवई यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात केली.