शेलापूर येथील नेहा कलेक्शन फोडले; 57 हजाराचा माल लंपास!

246

मोताळा(BNUन्यूज) मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या शेलापूर येथील मंगलेश कापसे यांचे बसस्टॅण्डवर असलेले नेहा कलेक्शन दुकान फोडून अज्ञात चोरट्याने 57 हजार 500 रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना 13 ऑक्टोबरच्या सकाळी 7.45 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. ऐन सणासुदीच्या तोंडावर दुकान फोडल्याने व्यापारीवर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कापसे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेलापूर बसस्टॅण्ड येथे मंगलेश शालीकराम कापसे यांचे नेहा कलेक्शन नावाचे कापड दुकान आहे. .12 ऑक्टोबरच्या सायंकाळी ते नेहमी प्रमाणे रात्री 7.30 वाजता दुकान बंद करुन ते घरी गेले. दरम्यान गुरुवार 13 ऑक्टोबरच्या सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना त्यांचे नेहा कलेक्शन दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील 1 लक्स व्हीनस बनीयन दोन बॉक्स किंमत 1200 रुपये, 2.लक्‍्स व व्हीनस निकर 3 पिस 200 रुपये, चॅम्पीयन निकर 1 पिस किमती अंदाजे किेमत 100 रुपये, नाइट पॅटं 15 पिस 3 हजार रुपये, लहान मुलांचे नाइट पॅटं 5 पिस 700, लहान मुलांचे डेस 10पिस 3 हजार, शर्ट 30 नग 7 हजार, .टीशर्ट एम सइज 6पिस 1200 रुपये, जिन्स पॅन्ट 50 पिस 18 हजार, लहान मुलांचे ड्रेस 40 नग 14 हजार , .टीशर्ट 30 पिस 6 हजार, लहान मुंलांचे जिन्स 10 पिस 2 हजार 500, टोपी 10पिस 600 रुपये असा एकूण 57 हजार 500 रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याच्या मंगलेश कापसे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला अप क्र.0438 अन्वये भादंवीचे कलम 380, 461 अन्वये अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे. (फोटो-कार्टून)