लताबाई भागवत सप्ताहाला गेली अन् चोराने तिची दिड लाखाची पोथ लंपास केली!

259

मेहकर तालुक्यातील कळमेश्वर येथील घटना

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (28.Apr.2023) कोणाच्या मनात काय आहे, अन् काय नाही हे कधीच सांगता येत नाही. जानेफळ पोस्टे.अंतर्गत असलेल्या कळमेश्वर येथील लताबाई श्रीराम बोराडे ह्या महिला भागवत सप्ताहानिमित्त भावाच्या घरी गेलेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 1 लाख 36 हजार रुपयांच्या दागीण्यावर डल्ला मारल्याची घटना 27 एप्रिल रोजी उघडकीस आली. सदर घटनेची माहिती लताबाईला त्यांचे पुतणे ज्ञानेश्वर बोराडे यांनी फोनद्वारे दिली होती.

लताबाई बोराडे कळमेश्वर ता.मेहकर ह्या त्यांचे भाऊ गजानन हरामकार यांचे घरी गोमेश्वर येथे सप्ताह करीता गेल्या होत्या. दरम्यान 26 ते 27 एप्रिलच्या सुमारास सकाळी 9 वाजेपर्यंत त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने त्यांनी गव्हामध्ये ठेवलेल्या स्टीलच्या डब्यातील सोन्याच्या मण्याची गहूपोथ तसेच पदक असे 34.500 ग्रॅम 1 लाख 36 हजार किमतीचे दागीणे चोरट्याने लंपास केल्याचे आढळून आले. त्यांच्या घराचे कुलूप चोरट्याने तोडल्याचे त्यांचे पुतणे ज्ञानेश्वर बोराडे यांनी लताबाई यांना माहिती दिली होती. लताबाई बोराडे यांच्या फिर्यादीवरुन जानेफळ पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द जानेफळ पोस्टे.अज्ञात चोरट्याविरुध्दा भादंवीचे कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय. प्रविण मानकर हे करीत आहे.