शेतकऱ्यांनो सावधान! विकृत झाले सक्रीय.. उकळी येथे सोयाबीन सुडी चेटविल्याने 15 हजाराचे नुकसान

204

मेहकर(BNU न्यूज) जिल्ह्यामध्ये विकृत मनोवृत्तीचे सुळी चेटविणारे सक्रीय झाले आहे. त्यांच्यापासून शेतकऱ्यांनी सावधान रहावे. काही मनोविकृत सक्रीय झाल्याने त्यांचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे. कुण्यातरी मनोविकृताने मेहकर तालुक्यातील उकळी येथील महिलेच्या शेतातील सोयाबीन पेटवून दिल्याचे आशा तुरुकमाने यांचे 15 हजाराचे नुकसान झाले आहे.

सौ.आशा तुरुकमाने यांनी मेहकर पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या गट क्र.146 मध्ये तीन एकर शेती आहे. त्यापैकी एका एकरामध्ये सोयाबीन पेरलेली होती. 4 ऑक्टोबर रोजी सोयाबीन सोंगून शेतात त्याची सुडी लावलेली होती. शुक्रवार 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास शेतात चक्कर मारण्याकरीता फिर्यादी गेली असता त्यांना सोयाबीनची सुडी जळालेली दिसली. यामध्ये त्यांचे 15 हजाराचे नुकसान झाले आहे. सौ.तुरुकमाने यांच्या फिर्यादीवरुन मेहकर पोस्टे.ला अज्ञात आरोपीविरुध्द भादंवीचे कलम 435 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (फोटो-संग्रहीत)