बुलढाणा स्थागुशाची नांदुऱ्यात कारवाई; एका लाखाचा गुटखा पकडला!

254

जिल्ह्यात सर्वीकडेच मिळतो गुटखा; कारवाई मात्र मोजकीच!

नांदुरा(BNUन्यूज) एकीकडे शासनाने राज्यामध्ये गुटख्यावर बंदी घातली आहे. परंतु आज प्रत्येक खाजगी, शासकीय कार्यालयात अधिकारी, पोलिस कर्मचारी, सर्वसामान्य नागरिकांसह शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी व शिक्षकांना सर्रासपणे गुटखा मिळतो. मात्र कारवाई मोजक्यात गुटखा विक्रेत्यावर होते, आर्थिक दिवाण घेवाणीमुळे खरे गुटखा माफीया कारवाईपासून कोसो दूर आहे. 13 ऑक्टोबर रोजी नांदुऱ्यात दुपारी 2 वाजेच्या दरम्यान बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखेने कारवाई करीत आरोपीकडून 1 लाख 9 हजार 260 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

बुलढाणा स्थागुशाने मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदुऱ्यातील विश्राम गृह नांदूरा येथे नाकाबंदी करुन नांदूराकडून खामगावकडे जाणाऱ्या होन्डा ॲक्टीव्हा 5 जी क्र.एम.एच.28 बीडी-2227 वर तीन बॅगमध्ये पराग राजेश भट्टड सराफा गल्ली फरशी खामगाव हा आढळून आला. त्या बॅगमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा 198 पॉकीट 39 हजार 204 रुपये, व्ही-1 तंबाखुच्या पुड्या 198 नग 4,356 रुपये, बॅग 2 हजार रुपये, कथीया रंगाची ट्राली बॅग 1200 रुपये कथीया रंगाची बॅग 500 रुपये, मोबाईल 12 हजार, होन्डा ॲक्टीव्हा 5जी 50 हजार असा एकूण 1 लक्ष 9 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. सदर कार्यवाही बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखा पोलिस निरीक्षक यांच्या आदेशान्वये स्थागुशाचे पोहेकॉ.गणेश किनगे, पोहेकॉ.ओमप्रकाश सावळे, पोहेकाँ.चांदुरकर, पोकॉ.सतिष जाधव, महिला पोकाँ.सरीता वाकोडे, चालक पोकाँ. मधूकर रंगड यांनी केली. आरोपी पराग भट्टड याच्यावर नांदुरा पोस्टे.ला अप.क्र.0562/22 अन्वये भादंवीचे कलम 188, 273, 328सहकलम अन्न सुरक्षा मानके कायदा कलम 2006 चे कलम 26 (2),(IV),59 (II) अन्वये नांदुरा पोस्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.