राकाँ.च्या डॅशींग माजी मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल घाटेंची पदोन्नती ! उध्दव ठाकरे शिवसेनेत झाले ते जिल्हा उपप्रमुख!!

364

मोताळा(BNU न्यूज) आंदोलन सम्राट, जनतेचे अडलेले कामे एका झटक्यात मार्गी लावणारे तसेच शिवसेनेची आक्रमकता रक्तात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल घाटे यांची उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या घाटाखालील उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याने शिवसेनेला घाटाखाली एक उपजिल्हाप्रमुख मिळाल्याने उध्दव ठाकरे गटात नवचैतन्य निर्माण झाले आहे. यामुळे घाटाखाली बुलढाणा मतदारामध्ये शिवसेनेला मोठे बळ मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

प्रेमात, युध्दात आणि राजकारणात सर्व काही क्षम्य असते, त्याचा प्रत्येक मोताळा तालुक्यात आला आहे. राष्ट्र्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुनिल घाटे हे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत सामिल झाले आहेत. तसा त्यांनी काही दिवसापुर्वी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, जालिंधर बुधवत, प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या उपस्थितीत मातोश्री मुंबई येथे प्रवेश घेतला असून मोताळा ग्रामपंचायतचे माजी सदस्य संजय भगवानराव पाटील, युवक ता.अध्यक्ष ओम बोरडे युवा ता.उपाध्यक्ष यांनी प्रवेश घेतला आहे. अनंता दिवाणे यांची उध्दव ठाकरे गट शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजु बोरसे यांची तालुका संघटक म्हणून निवड करण्यात आली. एका भव्य मेळाव्यात 90 ते 100 नागरिक ठाकरेगट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने शिवसेनेला मोताळा तालुक्यात मोठी उभारी मिळणार असल्याचे बोलल जात आहे.

तीन नगर सेवक शिंदे गटाच्या वाटेवर..
काँग्रेसचे माजी नगर सेवक विजय सुरडकर व त्यांच्या पत्नी विद्यमान नगर सेवक सौ.सरिता विजय सुरडकर या दाम्पत्यांनी शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश घेतला असल्याने त्यांना काँग्रेस गटनेत्या पुष्पाताई जैन यांच्यावतीने नोटीस सुध्दा देण्यात आली आहे. एकंदरीतच प्रेमात, युध्द व राजकारणात सर्व काही क्षम्य असल्याचा अनुभव आणखी येणार आहे. म्हणजेच आमचं ठरलयं….! याप्रमाणे आणखी तीन नगर सेवक शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये भाऊबीज नंतर प्रवेश करण्याची माहिती ‘बुलडाणा न्यूज अपडेट’ला एका विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. दिवाळी व भाऊबीजनंतर ते नगर सेवक खरंच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करतात का? की स्वगृही राहणे पसंद करतात, हे लवकरच कळेल, एवढे मात्र निश्चीत!