600 रुपये हिसकवीणे प्रकरण अंगलट: तिघांना 3 वर्षाचा कारावास!

220

4 वर्षापूर्वी केली होती बुलढाणा येथील गांधीभवन येथे लूटमार !

बुलढाणा(BNUन्यूज) देशात राजकीय मंडळी मोठमोठे भ्रष्टाचार व त्यांच्यावर अनेक केसेस असतात, ते प्रकरण वर्षानुवर्ष न्याय प्रविष्ठ असते. परंतु पोलिस प्रशासनाने मनात आणले तर आरोपींना शिक्षा होवू शकते, याचा प्रत्येय बुलढाणा जिल्ह्यात आला आहे. 4 वर्षापूर्वी बुलढाणा शहरात गांधी भवन ऑफीसच्या जवळ जयस्तंभ चौक येथे चाकूचा धाक दाखवून एका इसमाकडून 600 रुपये हिसकावून घेतले होते. या प्रकरणातील तीन आरोपींना 4 वर्षानंतर दोषी ठरवून न्याय दंडाधिकारी, बुलढाणा यांनी 3 वर्ष सक्षम कारावास व प्रत्येकी 1 हजार रुपये दंड ठोठाविला, तसा आदेश 31 ऑक्टोबर रोजी पारीत केला आहे.

आरोपी कुणाल उर्फ श्याम विश्वनाथ गवई, विनोद संजय बाहेकर, सुरज मधूकर भिसे बुलढाणा यांनी 29 जून 2018 रोजी शिवदास प्रल्हाद सुरडकर बुलढाणा हे मोटर सायकलवरुन जात असतांना त्यांना हात दाखवून थांबवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिश्यातील 600 रुपये हिसकावून घेतले होते. याप्रकरणी शिवदास सुरडकर यांच्या फिर्यादीवरुन बुलढाणा शहर पोस्टे.ला 29 जून 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी यांनी चौकशी करुन वि.न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपत्र दाखल केले होते. न्यायालयात प्रकरण सुरु झाल्यानंतर सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदारांचे साक्ष पुरावे नोंदविण्यात आले हेाते. पुराव्यावरुन सरकारी वकीलांच्या युक्तीवादावरुन वि.न्याय दंडाधिकारी प्र.व.कोर्ट क्र. 4 थे, बुलढाणा पिठासीन अधिकारी वामन जाधव यांनी आरोपी कुणाल उर्फ श्याम गवई, विनोद बाहेकर, सुरज भिसे यांना दोषी ठरवून 3 वर्ष सक्षम कारावास व प्रत्येकी 1 हजार असा 3 हजार रुपयांचा दंड ठोठाविल आहे. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनाविण्यात आली, तसा आदेश 31 ऑक्टोबर रोजी पारीत करण्यात आला आहे.

यांनी पाहिले कामकाज..
सरकार पक्षातर्फे सहा.सरकारी अभियोक्ता वैशाली विजयकुमार कस्तुरे यांनी कामकाज पाहिले. तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.बी.नागलोत तर पैरवी अधिकारी म्हणून पोकाँ.गजानन मांटे यांनी मदत केली.