मोताळा येथे शुकवारी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

382

मोताळा(BNUन्यूज)-स्थानिक प्रांजल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मोताळा येथे शुक्रवार 18 नोव्हेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी व अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबिराचे आयोजन सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेच्या दरम्यान करण्यात आले आहे. या शिबिराचा रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा, राजाराम बापू(घोंगटे) फाऊंडेशन तथा जाणिव बहुउद्देशीय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदुरा रोड मोताळा येथील प्रांजल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मोताळा येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तज्ज्ञ डॉक्टर नेत्र तपासणी करणार आहेत. मोतिबिंदू ऑपरेशन SICS पध्दतीने फक्त 1100 पासून उपलब्ध आहे. जापन व जमर्न मशिनद्वारे बिना टाक्याची फेको पध्दतीची मोतिबिंदू केवळ 7 हजारापासून पुढे उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

शिबिरामध्ये सहभागी होवू इच्छीणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी अ‍ॅड.विनोद पाटील (घोंगटे) मो. 9665351973, मनोज यादव मो.8999572802, विलास जुनारे मो.9422772568 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.