रिधोरा येथे शेती नांगरटीचा वाद विकोपाला गेला; दोन गटात हाणामारी; 7 जणांवर गुन्हे दाखल !

979

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (28.May.2023) मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या रिधोरा शिवारात शेती नांगरटी करीत असतांना दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये परस्परविरोधी फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला दोन्ही गटातील 7 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर घटना 27 मे रोजी सकाळी 11 वाजता रिधोरा शिवार गट नंबर 76 मध्ये घडली. पुढील तपास बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी गुलाबराव वाघ हे करीत आहेत.

दिगांबर चांगो मानकर यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादीच्या पुतणीची वहिती करत असलेली शेती नांगरणी करीत असतांना फिर्यादी व त्यांचा मुलगा व भाऊ यांनी सुनिल चंद्रभान घाटे, पवन सुनिल घाटे, विजय धांडे तिन्ही रा.मोताळा व निंबाजी गायकवाड रा.पिं.पाटी यांना आमची शेती का नांगरत आहात असे विचारल्याने उपरोक्त आरोपींनी फिर्यादी व त्यांचा मुलगा व भाऊ यांना लोखंडी रॉडने मारहाण करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या, अशा तोंडी रिपोर्ट व मेडीकल सर्टीफिकीटवरुन बोराखेडी पोलिसांनी आरोपी सुनिल घाटे, पवन घाटे, विजय धांडे व निंबाजी गायकवाड यांच्यावर भादंवीचे कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. तर निंबाजी भिमराव गायकवाड रा.भोरटेक यांनी बोराखेडी पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हे साक्षीदार यांचे रिधोरा जहागीर शिवार गट नंबर 76 मधील शेतात ट्रॅक्टरने नांगरटी करीत असतांना डिगांबर चांगो मानकर, विकास डिगांबर मानकर व कमलाकर मानकर सर्व रा.रिधोरा हे निंबाजी गायकवाड यांच्याजवळ आले व फिर्यादी व साक्षीदार यास म्हणाले, आमच्या शेतात नांगरटी का करीत आहे, शेतातून निघून जा, असे म्हणून निंबाजी गायकवाड यांना जातीवाचक शिविगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा तोंडी रिपोर्ट व मेडीकल सर्टीफिकीटवरुन बोराखेडी पोलिसांनी डिगांबर मानकर, विकास मानकर व कमलाकर मानकर यांच्यावर बोराखेडी पोस्टे.ला भादंवीचे कलम 323, 504, 506, 34 , सहकलम 3(1),(r),3(1),(s),3(2)(Va)अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारी गुलाबराव वाघ हे करीत आहेत.