गद्दारांना गाढण्यासाठी सज्ज व्हा; उध्दव ठाकरे गरजले!

371

शिंदे-फडणवीस, अब्दुल सत्तार व ताईचाही घेतला समाचार

BULDANA NEWS UPDATE

चिखली-(26 NOVEMBER 2022)जुने होते ते फसवे होते. त्यांना बुलढाणा जिल्हा त्यांची मालमत्ता वाटली होती. सरकार पाडले गेले त्यावेळी आ.नितीन देशमुख भेटले त्यांना सुध्दा घेवून गेले होते. परंतु त्यांनी कापले तरी तुमच्यासोबत येणार नाही. ते परत आले बाकी तिथे गेले, हा शेतकरी मेळावा असून सर्वच शेतकरी आहेत. त्यांना तिथे आशिर्वाद घ्यायला जावे लागले मी येथे तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो. बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व रेणूका माता जिल्ह्यात असतांना ते मुख्यमंत्री रेड्यांना घेवून तिकडे दर्शनाला गेले, असा टोला लगावीत उध्दव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करीत या गद्दार रेढ्यांना गाढण्याचे त्यांनी आवाहन केले.

चिखली येथे 26 नोव्हेंबर रोजी भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना पुढे नाव घेता खा.भावनाताई गवळी यांचा खरपूस समाचार घेतांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुढील काही जणांना घेवून गेले, बाकी नाही गेले.. तिकडे आपल्या पलिकडेच्या ताई, आमदार व खासदार यांना तुम्हीच निवडून दिले. ताईवरच्या आरोपांचा पाढाच वाचल्या गेल्याने ताई मोठ्या हुश्श्यार पंतप्रधानांना राखी बांधून फोटो सोशल मिडीया ठेवला ‘ भैय्या मेरे राखीको जपना’ मग कोणाची हिंमत आहे का? त्यांच्यावर कार्यवाही करण्याची ?? आम्ही शिवसेना भाजपासोबत 25 ते 30 वर्ष होतो. परंतु आता भाजप आयात पक्ष बनला असून हा पक्ष भाकड झाला आहे. बाहेरच्या पक्षातून आयात केलेले किती आहेत. भाजपा हा पक्ष आहे की, चोरटा बाजार आहे, असा प्रश्न 40 गद्दारांना प्रश्न विचारतो,असे उध्दव ठाकरे म्हणाले. पुढे बोलतांना खासदार व आमदार आहेत, मर्दांगी असाल तर त्यांनी भाजपाच्या नावावर लढणार नाही, असे घोषीत करावे. आज इकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी जमलेले आहेत त्यांना सांगा. छत्रपतींचा अपमान व राज्यातील उद्योगधंदे गुजरात कडे वळविले, कारण गुजरातच्या निवडणूका जिंकायच्या आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांनी सोलापूर व इतर शहरावर दावा केल्याने पंढरपूरचा विठोबा कर्नाटकला जाणार , मग माझा वारकरी पंढरीच्या दर्शनासाठी कर्नाटकामध्ये टोल भरुन दर्शनाला जाईल काय? मग ते अक्कलकोट पळविणार ते सहन होण्यासारखे आहे का? असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला. सावरकरांविषयी आम्ही दिलखुशपणे बोललो, हे मिंधे सरकार असतांना राज्यापालाचा काळयाटोपी खाली काय दडलंय, हे मी मान्य करणार नाही, परंतु त्यांना मान्य असल्याचे ठाकरे म्हणाले.

त्याला लाथ मारुन काढून टाकले असते..
अब्दूल सत्तारांचा अब्दुल गट्टार असा उलेख करीत याने खा. सुप्रीया सुळेंचा खालच्या भाषेत अपमान केला आहे. मी मुख्यमंत्री असतो तर त्याला लाथ मारुन काढून टाकला असता, तुम्ही वाघ आहेत का? असा थेट प्रश्न मुख्यमंत्री शिदे यांना विचारला.

देवेंद्र फडणवीस हिंमत असेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विजबील माफ करा..
उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवित मी मुख्यमंत्री असतांना तुम्ही मध्यप्रदेश सरकारने 6500 कोटींचे विजबिल देवून शेतकऱ्यांना माफ केल्याचा दाखल देत होते. आता महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. विज बिलाची सक्तीने वसुली होत आहे, त्यांना वेळेवर डीपी बदलून मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागतो. विरोधी होते त्यावेळी वेगळी भाषा होती, आता राज्यात तुमचे सरकार आहे, 5 महिन्यात 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांचे मध्यप्रदेश प्रमाणे विजबिल भरुन त्यांना विजबील माफ करण्याचे खुले आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिले. मुख्यमंत्री झालो आणि नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ केले, तुमच्याप्रमाणे फक्त घोषणांचा पाऊस पाडला नाही. मुख्यमंत्री असतो तर शेतकऱ्यांवर आपत्तीची वेळ येवूच दिली नसती. शिवसेना त्यांनी फोडली असे त्यांना वाटले असेल तर ही त्यांची भूल असल्याचा टोला फडणवीसांना लगाविला आहे.

शेतकरी हेलीकॉप्टरने शेतात केंव्हा जाईल?
युटूबर व्हिडीओ पाहिला, दिवाळीला..!! मुख्यमंत्री रमले शेतीत, नारुचा रेागी कळवा 1000 रुपये मिळवा, हेलीकाप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवावावे 1 लाख मिळवा.. हेलीकाप्टरने पांदण रस्ता चिखल तुडवित यमराज बसला असतो, डीपी जळाल्यानंतर हेलीकॉप्टरने शेतात जातात. असा कोणता शेतकरी हेलीकॉम्पटरने जावू शकेल का? राबून राबून त्याच्या हातावरच्या रेषा पुसल्या आहेत. आपण हिंदुत्वाबद्दल कधी कोणाला फसविले नाही. हिंदुत्व सोडलं काँग्रेससोबत गेलो, मग कश्मीरच्या मेहबुबा मुक्ती भारत माता की जय, का बोलत नाही, हे भाजपाला विचारा व सरकारमधून बाहेर पडावे, औरंगाबादचे संभाजी नगर, उस्मानाबादचे धारशीव करणाऱ्याला काँग्रेस व राष्ट्रवादीने परवानगी दिली होती. बौक्यांना खोक्यांची ओढ लागली होती. गोरगरीबांनी तुम्हाला दिल्ली व मुंबईत पाठविले होते, काहीतरी मिळाले परंतु गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असा टोला नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह गद्दारांना उध्दव ठाकरे यांनी लगावला.

…काल काढदिवस होता-खा.सावंत
33 वर्षापुर्वी चिखली येथे हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती, त्याच ठिकाणी आज उध्दव ठाकरे साहेबांची सभा होत आहे. जय भवानी जय शिवराय नामोउल्लेखाने सभेला सुरुवात करीत, उध्दव साहेब तुम्ही आले आणि रेणुका माताचा प्रसन्न झाली. 25 नोव्हेंबरला काढदिवस होता, एक म्हणतो चून चून के मारेंगे तर दुसरे संजय राऊत हे मात्र पक्ष निष्ठेसाठी जेलमध्ये जातात, असा नावाचा उल्लेख न करता खा.प्रतापराव जाधव व आ.संजय गायकवाड यांच्यावर खा.सावंत यांनी टोला लगाविला.

एकही गद्दार परत निवडून येता कामा नये-खा.संजय राऊत
हजारो लाखो मशाली शिवसेना चिन्हाने पेटलेल्या असून गद्दारांचे खोके बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही. ही भुमी राष्ट्रमाता मॉ साहेब जिजाऊची आहे. त्या पवित्र पावन भुमीत गद्दारीची बिजे रोवली गेली आहेत. ती कायमची उखडून टाकण्यासाठी मशाली पेटल्या आहेत. सर्वात जास्त खोके बुलढाणा जिल्ह्यात आले असून एक खासदार दोन आमदार आहेत. किती रेढे आले आणि किती गेले. या संताच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री 40 रेडयांचे बळी द्यायला गुवाहाटीला गेले, एकही गद्दार परत निवडून येता कामा नाही, असे खा.संजय राऊत म्हणाले. मी शिवसेनेसाठी 110 दिवस काय जन्मठेप भोगण्यासाठी तयार आहे. शिवसेनेसाठी खा.संजय राऊत शहीद झाला तरी पर्वा नाही. आज संविधान अमलात आणली आहे. तरी राज्य बेकाद्याने चालले आहे. एक बेकादेशीर सरकार डोक्यावर बसविले ते लवकरच जाणार, तुरुंगात जातांना भगवा होता, आणि येतांना सुध्दा व शेवटपर्यंत…!! शिवसेनेचे 25 खासदार व 115 आमदार निवडून आणून मुख्यमंत्री शिवसेनेचा देवून रेड्यांचा बळी आपण घेतला पाहिजे, असे आवाहन शेवटी संजय राऊतांनी केले.