ग्रा.पं.निवडणूकीत काँग्रेसच जिल्ह्यात नंबर वन 95 पेक्षा जास्त ग्रामपंचायतवर काँग्रेसचाच विजय-राहुल बोंद्रेंचा दावा

249

@buldananewsupdate.com
बुलढाणा (22Dec.2022) अरे वाह…काँग्रेसच जिल्ह्यात नंबर एकवर असून राष्ट्रवादी काँग्रेस दोन तरी शिंदेगट शिवसेना तीन व उध्दव ठाकरे गट शिवसेना चार तर भाजपा पाचव्या नंबर असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीच जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांनी केला असून, तसे पत्रकच त्यांनी प्रसार माध्यमांना दिले आहे. बोंद्रे म्हणतात, जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणुकीत कॉग्रेस (Congress) पक्षाने 95 ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे असून भाजप जिल्हाध्यक्षांच्या खामगांव मतदार संघात तसेच चिखली मतदार संघात भाजपाचा दारून पराभव झाला. गावखेडयातील लोकांनी भारतीय जनता पक्षाला सपशेल नाकारले असून निकालावर दृष्टीक्षेप टाकला असता भाजपाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे या निकालावरून स्पष्ट झाल्याचे बोंद्रे म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकामध्ये काँग्रेस व मित्र पक्षाने दमदार कामगिरी करीत गावातील लोकांनीही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत विजयावर शिक्का मोर्तब केला आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या ‘ खोटं बोला पण रेटून बोला’ या परंपरेला साजेस काम करीत काल विजयाचे खोटे आकडे माध्यमांसमोर मांडून जनतेची दिशाभूल करण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला असून काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या विजयाची धास्ती घेवून भाजपाचे जिल्हाध्यक्ष हे धादांत्न खोटे बोलत असल्याचा आरोप, राहुल बोंद्रे यांनी केला आहे.

भारत जोडोने वातावरण ढवळून निघाले..
खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारतजोडो (Bharat Jodo) यात्रेने बुलडाणा जिल्हयातील वातावरण ढवळून निघाले असून या पदयात्रेला सर्वजाती धर्माच्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, हे झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागात कॉग्रेसची पाळेमुळे आजही घट्ट आहे, जनतेने काँग्रेस पक्षावर दाखविलेला विष्वास आम्ही सार्थ ठरवू, असेही बोंद्रे म्हणाले.

काय म्हणतात बोंद्रे..
बुलडाणा (Buldhana) जिल्हयात झालेल्या 277 ग्रामपंचायती पैकी 95 ग्रामपंचयतीवर कॉग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवत जिल्हयात कॉग्रेस पक्ष 1 नंबर असल्याचे दाखवून दिले आहे. त्या खालोखाल दुस-या क्रमांकावर मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसला 50 जागा तर तिस-या क्रमांकावर शिंदे सेनेला 37, चौथ्या क्रमांकवर उध्दव सेनेला (Udhao Thakare) 30 जागा तर पाचव्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाला केवळ 18 जागा मिळाल्या असून वंचित बहुजन आघाडीला 5, अपक्ष 4, स्थानिक आघाडी 8 कॉग्रेसमित्र पक्ष 14, भाजप (BJP) मित्र पक्ष आघाडी 16 असे संख्याबळ राहले आहे, असे राहुल बोंद्रे यांनी स्पष्ट करीत ग्रामपंचायतीच्या निकालावरून जनतेने भाजपाला स्पष्टपणे नाकारले असतांना भाजपाकडून मात्र ‘गिरे तो भी टांग उपर’ या नितीने बोगस आकडयांचा प्रपोगंडा करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी प्रसार माध्यमांना प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.